आज मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेल्या दहा दहशतवाद्यांनी मुंबई हादरवून टाकली होती. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात 166 लोक मृत्यूमुखी पडले होते. मुंबईवर झालेल्या देशातील या सर्वात मोठ्या हल्ल्याबाबतच्या 10 महत्वपूर्ण गोष्टी बघूया..
1. 26 नोव्हेंबर, 2008 रोजी शस्त्रास्त्रांसह पाकिस्तानातील दहा दहशतवादी कराचीहून समुद्रामार्गे बोटीने मुंबईत घुसले.
2. जवळपास 10 दहशतवादी कुलाब्यातल्या मच्छिमार कॉलनीतुन मुंबईत घुसले आणि आपल्या दहशतवादी कारवायांना सुरुवात केली. मच्छिमार कॉलनीमधून बाहेर पडताना ते २ गटात विभागून बाहेर पडले.
3. यामधील 2 दहशतवादी हे नरिमन पॉईंट कडे गेले, 2 दहशतवादी ताज हॉटेलकडे, 2 सीएसटी कडे तर बाकी 2-2 करून हॉटेल ओबेरॉयकडे गेले.
4. दहशतवाद्यांच्या पहिल्या टीममध्ये इमरान बाबर आणि अबू उमर नामक दहशतवादी होते. हे दोघे लिओपोल्ड कॅफेला पोहचले आणि रात्री 9.30 ला मोठा स्फोट केला.
5. दहशतवाद्यांच्या दुसऱ्या टीममध्ये अजमल आमिर कसाब आणि अबू इस्माइल खान हे दोघे सामील होते. या दोघांनी सीएसटीवर अंदाधुंद गोळीबार केला. या दोघांनी येथे जवळपास 58 निरपराध नागरिकांचे प्राण घेतले.
6. शहिद तुकाराम ओंबळे यांनी स्वत:चा जीव देऊन अजमल आमीर कसाब या एकमेव दहशतवाद्याला जिवंत पकडलं. कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं.
7. दहशतवाद्यांची तिसरी टीम अब्दुल रहमान बड़ा आणि जावेद उर्फ अबू अली हे ताज हॉटेलकडे गेले. हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांनी आणि काही माजी सैनिकांनी हॉटेलमधील लोकांना पाठीमागील दरवाजाने बाहेर काढले होते.
8. दहशतवाद्यांची एक टीम हॉटेल ओबेरॉयमध्ये घुसली. त्यांनी तेथे अंधाधुंद गोळीबार करत 32 जणांचे प्राण घेतले.
9. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, पोलीस अधिकारी विजय साळसकर, आईपीएस अशोक कामटे आणि कॉन्स्टेबल संतोष जाधव यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि जवान दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झाले.
10. मुंबई पोलीस, एटीएस अधिकारी, एनएसजी कमांडो, मार्कोस, अग्निशमन जवानांनी प्राण पणाला लावत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…