गुप्त धन आणि खजिना या बद्दल सर्वाना आकर्षन आहे. अनेक कथा या खजिना व गुप्तधनाबाबत गावागावात चर्चील्या जात असतात. अनेक पुरातन ठिकाणी काही लोक खोदकाम करून गुप्तधन किंवा खजिना मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावर ही गुप्तधनाच्या लालसेने अनेक वेळा खोदकाम करण्यात आले होते. आता एक घटना समोर आली आहे ज्यात 100 किलो सोने एका ठिकाणी मिळाले. काय आहे ही घटना आपण खासरे वर पाहूया..

यवतमाळ जिल्ह्यातील बिटरगावहून चार किलोमीटर अंतरावर, विदर्भ रॉबिनहूड श्यामा कोलामची टेकडी आहे. श्रीमंत सावकारांना लुटून ती संपत्ती तो गोरगरिबांत वाटायचा. सावकारांकडून लुटलेले दागदागिने आणि इतर धन तो टेकडीवर ठिकठिकाणी पुरून ठेवत असे. टेकडीजवळील घनदाट अरण्यातच त्याचे वास्तव्य असल्याने ह्या टेकडीला आजही ‘श्यामा कोलाम टेकडी’ म्हटले जाते. हे गुप्तधन शोधण्यासाठी अनेक लोक या टेकडीवर येत. इंग्रज सरकारचे शिपाईही श्यामा कोलामच्या मागावर ह्या परिसरात नेहमी यायचे. आपल्या सामाजिक कामासाठी त्यांनी विवाह बंधनात अडकायचे नाही असे ठरवले होते. पुढील काही दिवसात आम्ही तुम्हाला श्यामा कोलम विषयी माहिती देणारच आहोत. आता या घटनेची माहिती बघूया.
तुळजापूर नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असताना कोसदनी घाटात. एका शेतात महामार्गाच्या शुशोभीकरणासाठी मुरूम काढण्याचे काम सुरू होते. या शेतात 18 नोव्हेंबर च्या रात्री तब्बल 100 किलो सोने मुरूम काढताना सापडल्याची चर्चा आहे.
कोसदनी जवळच्या आसपास च्या गावात ही चर्चा ऐकायला मिळाली तेव्हा काही हौशी तरुण ज्या ठिकाणी हा 100 किलो सोन्याचा खजिना मिळाला त्याठिकाणी त्याठिकाणी जाऊन आले तर त्याठिकानाहून जेसीबी मशीन ऑपरेटर ट्रेलर ड्रायवर मजूर इत्यादी लोक गायब होते. तर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. पोलिसांनी ही या ठिकाणी खजिना मिळाल्याच्या बातमीवर चुप्पी साधल्याचे दिसून आले.
ही घटना यवतमाळ जिल्हात कोसदनी घाटाच्या पुढे महामार्ग पोलीस छावणीच्या पाठी मागील शेतात घडली आहे. या घटनेनंतर आसपास च्या गावात लोके रात्रभर जागी राहून या घटनेची चर्चा करत होती. ऐकून मुरूम ज्या शेतातून खोदल्या जात होता तेथील कामगार गायब होण्याच्या व पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्यानें या चर्चेत तथ्य मानण्यात येत आहे.
या ठिकाणी खजिना असल्याची दंतकथा अनेक वर्षांपासून सुरू होती. विदर्भाचा रॉबिन हूड म्हणून श्यामा कोलामला ओळखले जाते. काही जणांच्या म्हणण्यानुसार श्यामा कोलाम याने या ठिकाणी आपला खजिना ठेवला होता तोच खजिना आता सापडला असल्याची शक्यता आहे. ज्या लोकांना हा खजिना सापडला आहे ती व्यक्ती देशातील एका मातब्बर राजकारण्यांची नातेवाईक असल्याने सध्या पोलीस हे बघ्याच्या भूमिकेतच आहेत..