भारतात विविधता आहे हे आपण वाचले आहेच. ६ हजार जाती अनेक धर्म परंपरा सोबत अनेक राज्य संस्कृती हि या देशात आहेत. आपल्या देशात असा एक भूभाग आहे ज्या ठिकाणी आज पर्यंत कोणी गेले तर जिवंत वापस आले नाही. आता हा भूभाग म्हणजे त्या ठिकाणी भूत पिशाच्च असतील अशी कल्पना करू नका. तो भूभाग म्हणजे एक बेट आहे. अंदमान निकोबार बेटांच्या भागात नॉर्थ सेंटीनेल नावाचे छोटे बेट आहे. तिथं सेंटीनेलिज आदिवासी जमात राहते, हि जमात सुमारे ६० हजार वर्षांपासून त्याच ठिकाणी राहत आली आहे. त्यांची आजची संख्या ४० ते ५० असावी असे सांगितले जाते.
सध्या या जमातीबद्दल चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या बेटावर आलेल्या एका अमेरिकन युवकाला ठार मारले. त्यामुळे सध्या या जमातीची पुन्हा चर्चा होत आहे तर आपण जाणून घेऊया या जमाती बद्दल
या बेटावरील आदिवासी जमातीचा संपर्क कधीच बाहेरील लोकांशी आला नाही. जेव्हा केव्हा बाहेरील जगातील लोकांनी त्यांच्याशी संपर्क करावयाचा प्रयत्न केला तेव्हा हि जमात आक्रमक होऊन जीवघेणा हल्ला करत आलीय. त्यामुळे त्या जमातीबद्दल अधिक कोणती माहिती समोर आली नाही. पण इंग्रजांनी जेव्हा अंदमान निकोबार बेटावर आक्रमण केले. तेव्हा असे म्हटले जायचे कि या जमातीचे ७ हजार ते ८ हजार लोक इस १७५० मध्ये होते. नंतर इंग्रजांनी १९०१ मध्ये केलेल्या जणगणना मध्ये यांची संख्या ६०० इतकी होती.
आज या जमातीची संख्या केवळ ४० ते ५० एवढी असावी असे सांगितल्या जाते. भारत सरकारने १९६७ साली या जमातीसोबत संपर्क करावयाचा प्रयत्न केला होता त्यांना खाद्य पदार्थ व वैद्यकीय सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला होता पण त्याठिकाणच्या आदिवासी जमातीला त्या गोष्टी आवडल्या नाहीत. १९८० साली काही लोकांनी या बेटावर जाण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा स्थानिक जमात व बाहेरील लोकांची मोठी लढाई झालेली तेव्हा पासून हे अधिक हिंसक झाले आहेत. आपल्या जवळ सुद्धा हे बाहेरील व्यक्तीला फिरकू देत नाहीत. २००६ साली या बेटाच्या जवळपास मच्छी मारी करणाऱ्या बोटे वर हमाल करून यांनी मच्छीमारांची हत्या केली आहे.
या जमातीला जगातील शेवटची ट्राइब म्हणून ओळखले जाते. या जमातीच्या संवर्धनासाठी १९६७ ते १९९१ पर्यंत भारत सरकार ने अनेक प्रयत्न केले.पण या जमातीने कधीच बाहेरील लोकांशी नाते ठेवायचा प्रयत्न केला नाही. म्हणून १९९१ पासून या प्रदेशात बाहेरील माणसाला जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. तरीही काही लोक याठिकाणी अनधिकृत पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करतात.
अमेरिकन नागरिक जॉन एलन चाऊ हा स्थानिक मच्छिमाराला लाच देऊन या ठिकाणी अनधिकृतरित्या गेला होता. तो तिथे जाऊन या जमातीच्या लोकांसोबत मैत्री करू इच्छित होता त्यासाठी त्याने काही खाद्य पदार्थ फ़ुटबाँल इत्यादी गोष्टी सोबत नेल्या होत्या. पण या बेटावरील जमातीला ते आवडले नाही व त्यांनी जॉन एलन ची बाण मारून हत्या केली व मृतदेह समुद्र किनारी अर्धवट पुरून टाकला. या घटनेत ज्या मच्छिमारांनी जॉन ला बेटावर सोडले त्या ७ मच्छीमाराना पोलिसांनी अटक केले आहे.