प्रतापगढ जिल्ह्यातील लालगंज तालुक्यातील हि गोष्ट आहे अनिल मिश्रा यांच्या परिवाराची त्याची फक्त एकच इच्छा मुलांनी होऊन घराच नाव मोठे कराव. झाले सुध्दा तसेच त्याच्या चारही मुलांनी देशातील सर्वात मोठी परीक्षा उत्तीर्ण केली. आज खासरेवर बघूया त्याची हि प्रेरणादायी गोष्ट..
चार भावा बहिणीमध्ये योगेश मिश्र IAS आहेत. सध्या त्यांची पोस्टिंग कलकत्ता येथे CEO म्हणून आहे. दोन नंबर आहे बहिण क्षमा मिश्रा जी IPS आहे सध्या ती कर्नाटकमध्ये पोस्टिंग वर आहे. तीन नंबर आहे माधवी मिश्रा ती झारखंड कॅडर IPS आहे. सध्या ती प्रतिनियुक्तीवर दिल्ली येथे आहे. आणि चार नंबरला आहे लोकेश मिश्रा जो IAS आहे. सध्या तो बिहार मध्ये चंपारन जिल्ह्यात ट्रेनिंगला आहे.
भाऊ व बहिणीस प्रेरणा द्यायला पहिले स्वतः झाला IAS
सगळ्यात मोठा भाऊ योगेश सांगतो कि, IAS होण्याअगोदर तो नोयडा येथे सॉफ्टवेयर इंजीनियर होता. त्यावेळेस क्षमा आणि माधवी UPSC ची तयारी करत होत्या. रक्षाबंधन दिवशी परीक्षेचा निकाल लागला आणि पहिल्या प्रयत्नात त्या अयशस्वी झाल्या. दुसऱ्या दिवशी योगेश त्यांना भेटायला गेला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविला. आणि स्वतः ठरविले कि IAS व्हायचे ज्यामुळे लहान भावा बहिणींना प्रेरणा मिळेल. आणि केली तयारी सुरु पहिल्या प्रयत्नात IAS झालाही त्यानंतर त्याने भाव बहिणींना मार्गदर्शन केले.
दोन खोल्याचे घर, पाहुणे आल्यास राहायची पंचायत
माधवी सांगते कि, चार भावा बहिणीत वयाचा जास्त फरक नाही आहे. एका एका वर्षाने सगळे लहान मोठे आहे. जेव्हा जेव्हा लहानपणी भांडणे व्हायची तेव्हा चौघामधील एकजण भांडण मिटवायचे काम करत असे. क्षमा सांगते कि घर फार छोटे होते, पाहुणे आल्यास खूप परेशानी होत असे. आणि अभ्यास करताना हि एकमेकांना त्रास होत असे.
असा होता आयुष्याचा प्रवास
योगेश सांगतो कि, आमचे १२वि पर्यंतचे शिक्षण पैतृक येथे पूर्ण झाले हे गाव एक छोटस खेड. त्यानंतर पुढील शिक्षणा करिता मोतीलाल नेहरू राष्ट्रीय प्राद्योगिक संस्थान येथे BTech करायला पुढील शिक्षण अलाहबाद येथे घेतले. तिथेच इंजिनियरची नौकरी सुध्दा लागली. २०१३ साली IAS झालेली क्षमा सांगते कि MA पर्यंतचे तिचे सर्व शिक्षण तालुक्याला झाले. २००६ साली तिचे लग्न सुधीर सोबत झाले. सुधीर उत्तराखंड मध्ये अधिकारी आहे. त्यांनी पुढील शिक्षण घेण्याकरिता मला प्रेरणा दिली. सुरवातीला क्षमाची निवड २०१५ मध्ये DYSP साठी झाले होते. परंतु पुढील वर्षीच ती IPS झाली.
माधवी सांगते कि तिचेही पदवी पर्यंतचे शिक्षण तालुक्यावर झाले. त्यानंतर तिने अर्थशास्त्रात पीजी तिने अलाहबाद विद्यापीठातून केले. येथील शिक्षण पूर्ण झाल्यानतर PhD करिता जेएनयु दिल्ली येथे संशोधन सुरु असताना २०१६ साली तिची IAS म्हणून निवड झाली. सगळ्यात लहान भाऊ लोकेशने दिल्ली विद्यापीठातून केमिकल इंजिनियरची पदवी मिळविल्या नंतर कोटा राजस्थान येथे एका खताच्या कंपनीत नौकरी केली. त्यानंतर तो राज्यसेवेत BDO झाला आणि २०१६ साली UPSC पास करून IAS झाला.
धन्य ते आई वडील ज्यांनी ह्या रत्नांना मोठे केले. खासरे तर्फे यांना सलाम…
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे अश्या प्रेरणादायी गोष्टी वाचण्याकरिता नक्की लाईक करा..