एखादा कर्तबगार अधिकारी जनहितासाठी काही धडक निर्णय घेतो त्यावेळी ते निर्णय हितसंबंधी किंवा वरिष्ठांच्या हिताचेच असतात असे नाही. अशा वेळी काय होतं याचे अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. मात्र एक सनदी अधिकारी असा आहे ज्याला हितसंबंधाविषयी काहीही घेणं-देणं नसतं. ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत असतात. त्यामुळे ते कोणाला घाबरत नाहीत अशी त्यांची प्रतिमा आहे.
9 वर्षात त्यांची आज ही 12 वी बदली झाली आहे. ते आपले काम प्रामाणिक निर्भीडपणे निष्ठापूर्ण पद्धतीने करत असतात. कोणाच्या दबावाखाली येऊन त्यांनी आजपर्यंत कोणतेही काम केले नाही.त्यामुळे ते ज्या ठिकाणी जातात तेथील जनता त्यांच्यावर प्रेम करते. त्यांना जनतेचे प्रेम भरपूर मिळत आले आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का तुकाराम मुंढे पण एका व्यक्तीला घाबरतात. आता तो व्यक्ती कोण अशी तुम्हाला उत्सुकता वाटत असेल तर त्यांनी स्वतः जे काही सांगितले आहे तेच तुम्ही पहा..