अभिनेत्री करिना आणि सैफ अली खान यांचा ‘छोटा नवाब’ तैमूर नेहमीच चर्चेत असतो. तैमूर हा एवढ्या छोट्या वयात एखाद्या मोठ्या सेलेब्रिटीपेखा जास्त प्रकाशझोतात राहतो. कधी कधी त्याच्या क्यूट लुक्समुळं सोशल मीडियावर चर्चेत राहतो तर न्यूज चॅनलची देखील तो पसंती आहे. तैमूर हा सर्वात जास्त लोकप्रिय स्टार किड् आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. एवढ्या कमी वयात चिमुकल्या तैमूरचा प्रचंड चाहतावर्गही तयार झाला आहे.
लोकप्रीतेच्या बाबतीत तैमूर हा एखाद्या सेलेब्रिटीला देखील मागे टाकेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तैमूरच्या फोटोंवर हजारो लाइक्स आणि कॉमेट्सचा पाऊस पडत असतो. कधी तो त्याला सांभाळणाऱ्या बाईच्या पगारावरून तर कधी त्याच्या झोपण्याच्या पाळण्यावरून तो चर्चेत असतो. पण आता पुन्हा एखादा तैमूर हा चर्चेत आला आहे एका वेगळ्या कारणावरून. ते म्हणजे तैमूरचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर आकारात असलेले चार्जेस.
सैफ अली खानाने याविषयी माहिती दिल्यानंतर याविषयी चर्चा सुरु झाली आहे. तुमच्या मनात पण त्याच्या एका फोटोची किंमत किती याविषयी प्रश्न पडला असेल. किती असेल तैमूरच्या एका फोटोची किंमत किती?
फोटोग्राफर्स तैमूरच्या एका फोटोसाठीतब्बल १५०० रुपये आकारतात असं सैफ अली खानाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे. कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा ही रक्कम जास्त आहे, असंही तो म्हणाला. कदाचित तैमूरचे फोटो पाहण्यासाठी त्याचे चाहते सोशल मीडियाकडे डोळे लावून बसलेले असतात त्यामुळेही फोटोग्राफर्सचे भाव वाढलेले असावे.
‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये सैफ आणि त्याची लेक सारा यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या दरम्यानं त्यानं अनेक मजेशीर गोष्टी शेअर केल्या.