सिंगापूर मध्ये मुली अत्यंत टंच कपडे घालतात. मी रनिंग ला जाताना पाहतो तर तिथे अत्यंत कमी कपड्यांत पळत असतात. शुक्रवार किंवा शनिवारी क्लब ला गेलो तर मुली त्यांच्या मित्रांसोबत clubbing करत असतात, टकीला- बीयर- वाईन चे ग्लास रिचवत असतात. स्विमिंग पूल वर त्या bikini मध्ये असतात तर जिम मध्ये स्किन फिट मध्ये.
त्या रात्री 2 वाजताही एकट्या बाहेर फिरतात.रेप वगैरे सोडाच, किंवा शारीरिक/शाब्दिक कमेंट पास करणेही सोडा, असे लाळघोट्या लुभऱ्या भीकरचोट नजरेनेही कुणी त्यांना न्याहाळताना मी कुणालाही पाहिले नाही. जो तो आपल्या आयुष्यात मग्न असतो. कुणी कुणाला कपड्यावरून किंवा रात्री अपरात्री बाहेर फिरण्यावरुन किंवा smoking drinking वरून जज करत नाही. कुणी कुणाला रुपयाला लुटत नाही की मारामारी करत नाही. कुठल्या चौकात स्प्लेंडर किंवा पल्सर आडवी पार्क करून घरच्यांनी समाजावर ओवाळून टाकलेले 4-5 रिकामचोट दिवटे मला कधीही दिसले नाहीत.
तुम्हाला वाटेल सिंगापुर ची संस्कृती फार महान आहे. Lol, तसे नसते, संस्कृति नावाच्या भिकारी गोष्टीवर नाही तर कायदा सुव्यवस्थे च्या जोरावर हा देश सेफ आहे. नाहीतर आपली महान संस्कृती पाहतोच आहे. रेप करणारी मनासिकता, रेपचे समर्थन करणारी नीच वृत्ती उघड उघड दिसते आहे. बॉलीवुड स्टार्स नवीन target आहेत, कारण त्यांनी निषेध वगैर केलाय. त्या stars च्या निषेधार्थ यांनी त्यांचे कमी कपड्यातले फोटो टाकून हे लोक रेप भावना उद्युक्त करत असल्याचे म्हटले आहे. असे कौतुकास्पद लोक तुम्हाला दिसतात का आजुबाजुला? हे नजरेचे दुशासन असतात.
– प्रशांत निंबाळकर
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…