आजकाल लठ्ठपणा हि अनेकांना भेडसावणारी समस्या बनली आहे. शरीरातील फॅट्स अधिक प्रमाणात वाढणे आजकाल सामान्य होत चाललं आहे. बदलत्या जीवनशैलीमूळे ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फॅट्स वाढल्याने माणसाचे शरीर अवाढव्य दिसते. यामुळे माणसाच्या चालण्या बोलण्यात आणि आत्मविश्वासावर सुद्धा इफेक्ट पडू शकतो. त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक बनले आहे. लठ्ठपणा तेव्हाच येतो जेव्हा शरीराचा चयापचय हळू अर्थात कॅलरीज कमी जळत असतील. पण लक्षात ठेवा लठ्ठपणा कमी करण्यापेक्षा अधिक आवश्यक आहे आपल्या शरीरातून घाण बाहेर काढणे. कारण यामुळेच चयापचय कमकुवत होतं. म्हणून आपल्याला वजन कमी करायचं असेल आणि चयापचय क्रिया वाढवायची असेल तर आपल्या हे ड्रिंक प्यावे लागणार. या ड्रिंकची विशेषता आहे की याने शरीरातील सर्व फॅट्स गळून जातील.
तर चला पाहूया ड्रिंक तयार करण्याची कृती
साहित्य- 1 कप शुद्ध पाणी 1 चमचा किसलेलं आलं 1 बारीक चिरलेली काकडी 1 लिंबाचा रस 12 पुदिन्याची पाने
कृती- एका काचेच्या जगामध्ये हे सर्व साहित्य भरून रात्रभर असेच राहू द्या. सकाळी त्यामधून आलं आणि पुदिन्याचे पाने काढून टाका. आता हे ड्रिंक एका ग्लासात टाकून प्या. आपण हे ड्रिंक फ्रीजमधून ठेवून दोन दिवसापर्यंतही वापरू शकता. या ड्रिंकमध्ये घातलेलं सर्व साहित्य हेल्दी आहे जे शरीराला शुद्ध करण्याचं काम करतो.
काकडी- अत्यंत कमी कॅलरीज असलेली काकडी वजन कमी करण्यासाठी उत्तम असते.
आलं- याने पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे खूप वेळापर्यंत आपल्याला भूक लागत नाही.
लिंबू- यात आढळणारे पेक्टिन फायबर अन्नाची तल्लफ कमी करतं. हे विषारी घटक काढून शरीराला स्वच्छ करतं.
पुदिना- याने ड्रिंकला स्वाद तर येतोच आणि याने भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…