आजकाल सर्वाधिक चर्चा होते ती पेट्रोल डिझेल वाढी बद्दल. सर्वसामान्य माणसाला जास्तीत फरक का पेट्रोल डिझेल च्या किमतीमुळे पडत असतो. देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये एक समस्या भेडसावत आहे ती म्हणजे इंधनतेलांच्या वाढणाऱ्या किमती व त्यांचा वाढलेला अवाढव्य वापर. पेट्रोल डिझेल हे नैसर्गिक साठे आहेत त्यांचा अतिवापर झाला तर कधी काळी ते संपू शकतील. त्यामुळे जगभरातील संशोधक हे इंधन तेलाला पर्याय देण्यासाठी संशोधन करत आहेत.
सध्या एका युवकांचा शोध महाराष्ट्रात कौतुकास्पद ठरत आहे. सर्वत्र त्यांच्या शोधाबद्दल मेसेंज सोशल मीडियावर वायरल होत आहेत. आता हा शोध म्हणजे त्यांनी पाण्यावर बाईक चालवायची किमया केली आहे का ? असा तुम्हाला प्रश्न पडेल. तर असाच काहीसा शोध त्या युवकाने लावला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याच्या योगेश बारी या तरुणाने एक असाच शोध लावला आहे. एक लिटर शुद्ध पाण्यात २०५ किलोमीटर बाईक चालवण्याची किमया त्याने केली आहे. आता हा अनेकांना काल्पनिक शोध वाटत असेल पण तो नाही आहे. योगेश हा शोध लावला आहे. त्यासाठी त्याला खर्च हा फक्त १२ हजार रुपये आला आहे. या खर्चात २० रुपये मध्ये २०५ किलोमीटर पर्यंत बाईक नेलेली. ९० रुपये लिटर पेट्रोल मध्ये पण एवढेच काय याच्या अर्धे पण ऍव्हरेज बाईक ला मिळत नाही. त्यामुळे योगेश च्या शोधा मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. योगेश कशाप्रकारे पाण्यावरून बाईक बनवली हे पण पाहणे उत्सकतेचे ठरेल.
योगेश बारी या तरुणाने आजपर्यंत अनेक शोध लावले आहेत काही वर्षांपूर्वी तो बाईक चे मायलेज वाढवण्यासाठी काही यंत्र बनवता येते का? म्हणून संशोधन करत होता तेव्हा त्याच्या लक्षात आले कि बाईक हि पाण्यावर सुद्धा चालू शकते. मग त्याने २ वर्ष संशोधन करून बाईक पाण्यावर चालवण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला त्याला हे करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर, शुद्ध पाणी, नळी, प्लास्टिक बॉक्स, व्हाल,डायड्रोजन सेल, सेफ्टी व्हाल.बॅटरी हि साधने लागली. व एकूण १२ ते १३ हजार खर्च आला. व पाण्यावर चालणारी बाईक तयार झाली.
सध्या योगेश ला हे संशोधन लोकांपर्यंत नेण्याची इच्छा आहे त्याच्या शोधाची दखल सरकारने घेऊन पाण्यापासून चालणाऱ्या गाड्या येण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे. योगेश च्या या हटके संशोधनाला खासरे चा सलाम. आणि आशा करूया कि लवकरच हि बाईक सर्वसामान्य लोकांच्या वापरासाठी बाजारात यावी.
Yogesh weather ever you studied at Bhadli bk.