काहीतरी वेगळ करायच हि प्रत्येक तरुणाची इच्छा असते. परंतु काही या इच्छेचा परमोच्च टोक गाठतात. अशीच काही कथा आहे मुळची इराण येथील मरल याझार्लू यांची चला खासरे वर बघूया तिची आगळीवेगळी कहाणी…
ईराण येथील Maral Yazarloo एका मिशणवर आहे आणि हे मिशन काही साधेसोपे नाही आहे. तिला फिरायचे आहे जगातील सर्व खंड तेही बाईकने…
हो अगदी बरोबर वाचल तुम्ही तिला फिरायचे आहे सर्व ७ खंड आणि ४५ देश बाईकने त्याकरिता ती पुणे येथे स्थायिक झाली आहे.
इराणमध्ये स्त्रियांना बाईक चालवायची परवानगी नाही आहे म्हणून ती भारतात आली तिच्याकडे 800CC ची BMW GS हि बाईक आहे. या बाईकचे वजन तब्बल ३७० किलो आहे आणि १९,००,००० रुपये एवढी आहे. तिच्याकडे एकूण ४ सुपर बाईक आहे ज्यामध्ये हार्ली डेविडसन व डूकाटी ह्या महागड्या गाड्या सुध्दा आहे.
या मिशनची सुरवात १५ मार्च पासून केली आहे. तिचा एक टप्पा पूर्ण झाला आहे ज्यामध्ये तिने म्यानमार, थाईलैंड व ऑस्ट्रेलिया या देशाची वारी बाईकने केली आहे. मरल ६ वर्षापासून बाईक चालवत आहे तिला १,००,००० किमी बाईकवर प्रवास करून नवीन जागतिक रेकॉर्ड करायचा आहे. या साहसी मिशन मध्ये तिला सोबती तिचा मित्र पंकज त्रिवेदी सुध्दा आहे.
तिला आपल्या देशात हि स्वतंत्रता मिळत नाही याकरिता तिने सध्या तिच्या देशात विनंती केली आहे कि महिलांना बाईक चालवायची संधी मिळावी तिचे म्हणणे आहे कि ती देशाला विरोध करत नाही तिला फक्त तिचा अधिकार हवा आहे.
या मिशन मध्ये ती Antarctica मध्येही जाणार आहे. आजपर्यंत तिथे फक्त २ महिला बाईकने पोहचू शकल्या आहे. याकरिता ती स्वतःला सध्या तयार करीत आहे. कतार आणि इजिप्त हे दोन देश तिला बाईक रायडींग करिता जास्त आवडतात.
मरल २००४ साली पुणे मध्ये आली इथे तिने MBA आणि त्यानंतर पुणे विद्यापीठातून PHd चे शिक्षण पूर्ण केले आहे. आतापर्यत ती एकूण ६७ देश फिरलेली आहे. सध्या पुणेमध्ये ती पंचशील ग्रुप सोबत काम करते आणि तिने २०१२ साली स्वतःचे फॅशन ब्रँड सुरु केले आहे जिथे आज ५० लोक काम करतात.
तिला तिच्या ह्या प्रवासाकरिता खासरे कडून शुभेच्छा… माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…