आज एका युवकाला असा वाईट अनुभव आला कि तो अनुभव आपल्या सारख्याना पण येऊ शकतो. त्यामुळे या युवकाचा हा अनुभव अवश्य वाचा यात्रा डॉट कॉम या कंपनी मार्फत म्हापसा ते पुणे असे ऑनलाइन बस तिकीट काढणे एका तरुणाला महागात पडले आहे. तर झाले असे की कृष्णा अग्रवाल हा तरुण सुट्टी निमित्ताने गोव्याला गेला होता तो गोव्यावरून वापस येण्याकरिता त्याने दिनांक १६ नोव्हेंबर रोजी चे तिकीट यात्रा डॉट कॉम या वेबसाईट वरून आत्माराम टूर्स अँड ट्रॅव्हल्स ची बस बुक करण्यात आली.
या तरुणाचे नाव कृष्णा अग्रवाल आहे. त्याने बस तिकीट बुक केल्यानंतर तो म्हापसा येथील आत्माराम ट्रॅव्हेल कंपनीच्या ऑफिस ला कृष्णा पोहचला तेव्हा त्याला ट्रेव्हेल कंपनीने सांगितले कि आपण ज्या बसचे तिकीट बुक केलंय ती बस लेट आहे आपण आमच्या आता निघणाऱ्या बसने जाऊ शकता. लगेच कृष्णा चे सामान बस मध्ये ठेवण्यात आले व त्याला बस ची सीट दिली. कृष्णा ने बस पुणे ला कधी पोहचेल हे विचारले तेव्हा त्याला सांगितले कि बस १० पर्यंत पोहचेल. कृष्णाने इतर बस पेक्षा या बसचे तिकीट जास्त पैसे देऊन काढले कारण त्याला लवकर पुणे मध्ये पोहचायचे होते.
तेव्हा त्याने बस ऑपरेटर ला सांगितले कि मला माझ्या बसने जाऊद्या ती बस मला ७ वाजता पुणे मध्ये पोहचवणार होती. त्यावर त्यांनी म्हटले कि तुम्हाला त्या बसने जाता येणार नाही. त्यावर कृष्णा बोलला कि मला माझे पैसे रिफंड करा मी माझ्या परीने जाईल. त्यावर ऑपरेटर बोलला घंटा भी रिफंड नही मिलेगा और उतरणे भी नही देंगे. त्यावेळी कृष्णा ने त्या लोकांचे मोबाईल मध्ये व्हिडीओ शूटिंग करणे सुरु केले होते ते सर्व पिलेले होते.
त्यावर तो सामान घेऊन बस मधून उतरला तेव्हा पाठीमागून एकजण येऊन बोलला व्हिडीओ डिलीट कर तेव्हा कृष्णा बोलला मी नाही डिलीट करणार तेव्हा आत्माराम ट्रॅव्हल चे ४ हुन अधिक जण आले आणि त्यांनी कृष्णाला बेदम मारहाण केली. एकाने कृष्णाचा मोबाईल काढून घेऊन दोन तीन वेळा आपटला. तर दुसरे लोक त्याला बेदम मारहाण करत होते.
त्याठिकाणाहून कृष्णा कसा तरी पळून गेला व त्याने लागलीच पोलिसांना बोलावले व पोलिसांनी त्याला हॉस्पिटल मध्ये नेऊन पोलीस स्टेशन ला घेऊन गेले कृष्णाने त्याघटने बाबत एफआयआर दाखल केला आहे. या घटनेनंतर यात्रा डॉट कॉम वेबसाईट ने या घटनेची कोणतीही दखल घेतली नाही. तसेच गुंडांचा भरणा असणारी आत्माराम ट्रेव्हेल वर देखील कोणती कार्यवाही करण्यात आली नाही.
कृष्णाला सकाळी लवकर पुणे ला पोहचायचे होते त्यासाठी अधिकचे पैसे भरून त्याने बस बुक केली याच बस ने त्याला भयंकर अनुभव दिला. या घटनेतील आरोपींच्यावर कार्यवाही होण्यासाठी व आपल्यासोबत हि हा प्रसंग घडू नये यासाठी हि घटना जास्तीत जास्त शेअर करा.
Action is to be need