दोन्ही नवरा बायको जर मोठ्या पोस्ट वर असतील तर ते आपल्या मुलाबाबतील जे काही निर्णय घेतील ते अत्यंत विचारपूर्वक असतील. असाच एक निर्णय या दाम्पत्यांने घेतला आहे जो आपल्या सारख्या अनेक पालकांना विचार करावयास भाग पाडणारा आहे. हिमाचल प्रदेश येथील नितीन भदोरिया आणि स्वाती श्रीवास्तव हे दाम्पत्य दोघेही जिल्हाधिकारी या पोस्टवर आहेत. त्यांनी आपला मुलगा अभ्युदय याला त्यांनी सामान्य मुले जातात अशाच अंगणवाडी मध्ये दाखल केले आहे. प्लेग्रुप सारख्या खाजगी ठिकाणी टाकण्याऐवजी या दाम्पत्याने गोपेश्वर या गावातील अंगणवाडी मध्ये प्रवेश घेतला.
या दाम्पत्याने अंगणवाडी मध्ये आपल्या मुलाचा प्रवेश घेतला कारण मुलाच्या सर्वंगीण वाढीसाठी जे वातावरण आवश्यक आहे ते सरकारी अंगणवाडीत असते. या ठिकाणी मुलाला सर्वसामान्य मुलांमध्ये मिसळता येते व त्याला या ग्रुप मध्ये राहून अनेक शिकायला मिळतात. सध्या मोठ्या फीस भरून मुलांना प्लेग्रुप मध्ये टाकायचे फॅड निघाले आहे. पालक सामाजिक दबावाखाली प्लेग्रुप मध्ये मोठ्या फीसेस भरून मुलांना टाकत आहेत. त्या प्लेग्रुपमध्ये मुलांची व्यवस्थित वाढ होते का हे पाहावे लागणार आहे.
अंगणवाडी ची रचना हि मुलांच्या आवश्यक विकासासाठी हवी तशीच केलेली आहे. प्लेग्रुप मध्येच मुले टाकली तर विकसित होतात असा एक गैरसमज परावसण्यात आला आहे. आपण भावनिक होऊन निर्णय घेतो कि मुलाच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड नको.. मग आपली परिस्थिती नसली तरीही लाखोंच्या संख्येत आपण फीस भरतो. आता हे दोन्ही आई वडील जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या कडे पैशाची कोणतीही कमी नसणार आहे.
ते वाटले त्या प्लेग्रुप मध्ये मुलाला टाकू शकले असते. पण त्यांनी सरकारी अंगणवाडीत प्रवेश दिला.आणि सर्वाना एक आदर्श उदाहरण घालून दिले. शाळा महाग आहे म्हणजे ती चांगली आहे असे होत नाही.