‘अवनी’ म्हणजे टी-1 वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आल्यानंतर तिच्या दोन बछड्यांची चिंता व्यक्त होत होती. मात्र या वाघिणीच्या बछड्याबद्दल माहिती मिळाली आहे. देशभरात सध्या अवनी वाघिणीबद्दल सर्वत्र आंदोलने सुरु आहेत तर अनेक प्राणीप्रेमी निषेधाचे हत्यार पण उपसत आहेत. अवनीच्या बछड्या बाबत सर्वानी चिंता व्यक्त केली होती. सकाळी यवतमाळमधील जंगलात त्यांचे दर्शन झाले आहे. यामुळे प्राणीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नरभक्षक अवनी वाघिणीला शार्पशूटरने गोळ्या घालून ठार केल्यानंतर देशभरातून महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू होती. तसेच वाघिणीचे बछडे बेपत्ता असल्याने वनविभागाला धारेवर धरण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रात्रंदिवस काम करत होते.
आता अशी माहिती समोर येत होती कि अवनीचे बछडे स्थानिकांनी परिसरात पाहिले होते त्याबाबत प्रशासनाने अधिकचा शोध घेतल्यावर त्यांच्याविषयी माहितीची समोर आली आहे. या बछड्यांच्या शोध पथकाला पेट्रोलिंग करताना हे बछडे दिसले आहेत. दोन्ही बछडे सुखरूप असल्याचे पेट्रोलिंग पथकाने सांगितले. आज विहिरगाव परिसरात रस्ता ओलांडत असलेले हे दोन बछडे दिसल्याचे सांगण्यात येत आहे. हे बछडे अवनीचे असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
चंद्रपूरमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा ट्रेनच्या धडकेने मृत्यू-
चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोजा भागातील जंगलात दोन बछड्यांचा रेल्वेरुळावर मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. सकाळी ५ च्या सुमारास बल्लारपूर गोंदिया या पॅसेंजर ने धडक देऊन दोन्ही बछड्याचा मृत्यू ओढवला आहे. या घटनेमुळे वन्यप्रेमींत अधिक संताप तयार झाला आहे. या घटनेचा पंचनामा वन विभागाने केला असून त्यात त्यांनी दोन्ही बछड्याच्या मृत्यूबाबत निवेदन जाहीर केले.
वन्यप्रेमीच्या म्हणणे आहे कि बछडयांचा मृत्यू हा संशयास्पद आहे. बछड्याच्या मृत्यूने आता पुन्हा देशातील वातावरण बिघडू शकेल. एकूण अवनी वाघिणीच्या समर्थनात केंदीय मंत्री मेनका गांधी यांच्यासहित देशातील अनेक प्रसिद्ध चेहरे आहेत. आता या दोन बछड्याच्या मृत्यूने वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे.