देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळख असलेल्या मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यावर्षी डिसेंबर मध्ये विवाहबद्ध होणार आहे. ईशा अंबानींचं लग्न आनंद पिरामल यांच्याशी होणार आहे. आनंद हा पिरामल ग्रुपचे प्रमुख अजय पिरामल यांचा मुलगा आहे. ईशा आणि आनंद हे १२ डिसेंबर रोजी मुंबईत विवाहबद्ध होणार आहेत. भारतातील सर्वात महागडे समजले जाणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या घरी त्यांचा विवाह होणार असल्याची माहिती अंबानी कुटुंबाकडून देण्यात आली. अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब असलं तरी पिरामल हे देखील एक नावाजलेले उद्योगपती आहेत. त्यांनी आपल्या मुलासाठी आणि होणाऱ्या सुनबाईसाठी गिफ्ट देणाऱ्या बंगल्याची सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
चर्चेचं कारणही तसेच आहे, या दोघांना गिफ्ट देण्यात येणाऱ्या या बंगल्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. लग्नानंतर पिरामल कुटुंब वरळी सीफेसला राहायला जाणार आहे. इशा आणि आनंदचा हा सीफेसचा नवीन बंगला ५ मजल्याचा आहे. ५० हजार चौरस फुटांचा हा बंगला अजय पिरामल आणि स्वाती पिरामल यांच्याकडून इशा आणि आनंदला गिफ्ट देण्यात येणार आहे.
काय आहेत खास सुविधा?
या बंगल्याच्या बेसमेंटमध्ये ३ मजले आहेत. ज्याचा वापर पार्किंग आणि सर्व्हीससाठी करण्यात येईल.बेसमेंटला एक लॉन, ओपन एअर वॉटर बॉडी आणि डबल हाईट मल्टिपर्पज रूम आहेत. वरच्या मजल्यावर लिव्हिंग रूम, डायनिंग हॉल, ट्रिपल हाईट मल्टिपर्पज रुम, बेडरुम आणि सर्क्युलर स्टडीज आहे. याशिवाय तळमजल्याला एक एंट्रन्स लॉबी आहे.
किती आहे किंमत?
सीफेसला असणाऱ्या इशा आणि आनंद यांच्या या नवीन बंगल्याची किंमत तब्बल ४५२ कोटी रुपये आहे. ईशा अंबानी सध्या अँटेलियामध्ये राहते. ईशा अंबानी यांचं नवं घरदेखील सोयीसुविधांनी युक्त आहे.