सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे उदघाटन आज माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झाले. हा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून याची जगभर ओळख तयार झाली आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा असल्याकारणाने या पुतळ्याच्या देखभालीचा दिवसाला खर्च हा काही लाखात असणार आहे. तर आपण माहिती घेणार आहोत या पुतळ्याच्या दिवसाच्या देखभाली चा खर्च.
या पुतळ्याला उभारणी करिता २ हजार ९८९ कोटी रुपये खर्च करण्यात आला. २७ ऑक्टोबर २०१४ रोजी लार्सन अॅण्ड टुब्रोने या चिनी कंपनीला मुर्ती बांधणीचे कंत्राटमिळाले होते. अडीच हजार कामगार, २०० इंजिनिअर्सने आपले कौशल्य पणाला लावून हा पुतळा साकारला आहे. या शिल्पाच्या देखरेखी साठी दिवसाला १२ लाख रुपये खर्च येतो आहे. १५ वर्षासाठी ६५७ कोटी रुपये खर्च होणार आहे तर यापैकी १४६ कोटी रुपये सरकार ने ५ पब्लिक अंडरटेकिंग कंपनीज कडून कॉर्पोरेट सोशल रेस्पोंसिबिलिटी चा या कामासाठी घेण्यात आला आहे.
कॉर्पोरेट सोशल रेस्पोंसिबिलिटी फंड हा कंपनीज ना सामाजिक दायित्व म्हणून हॉस्पिटल शाळा यांच्यावर खर्च करून गोरगरिबांना फायदा पोहचेल या दृष्टीने तो द्यावा लागतो. पण हा फंड या मोठ्या कंपन्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या देखरेखी साठी खर्च करत आहेत. सरकार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा भारतातील आधुनिक युगातील सर्वात खर्चिक स्मारक म्हणून पाहिले जातेय.
जगातील सर्वात उंच मूर्ती म्हणून चीन येथील गौतम बुद्धाची मूर्ती ओळखली जायची या मूर्तीची उंची १५८ मीटर इतकी आहे तर अमेरिकेतील स्टॅचू लॅब्रेटी हा एक भव्य म्हणून ओळखला जातो त्याची एकूण उंची ९३ मीटर आहे तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीची संपूर्ण उंची २०८ मीटर इतकी आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…