सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वायरल झाला आहे त्यात एक मुलगी आपले कपडे सर्वांसमोर काढत आहे. त्या व्हिडीओ ला सोशल मीडियावर अनेक अंगाने वायरल केले जात आहे. पण या व्हिडीओ पाठीमागील वास्तव वेगळे आहे. का त्या मुलीने कपडे काढले व ती कोण होती. यासाठी आम्ही या पाठीमागील सत्य शोधले.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मधील मुलीचे नाव मेघा असून ती एक मॉडेल आहे.त्यादिवशी काय घडले होते याबद्दल तिने फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे.त्यापोस्ट मध्ये तिने सांगितले आहे की त्या रात्री तिच्या बिल्डिंग च्या वाचमेन ने तिच्यासोबत अभद्र व्यवहार केला होता. त्यामुळे तिने पोलिसांना फोन करून बोलवावून घेतले होते.पोलीस बिल्डिंग मध्ये आले पण त्यांनी त्या मुलीलाच पोलीस स्टेशनला चालण्यासाठी दबाव टाकला.
भारतीय कायद्यांनुसार स्त्रियांना रात्री पोलीस पोलीस स्टेशन ला घेऊन जाऊ शकत नाहीत किंवा लेडी पोलीस कर्मचाऱ्याशीवाय स्त्रियांना ताब्यात घेऊ शकत नाहीत. पण त्या रात्री पोलीसासोबत कोणतीही महिला पोलीस नव्हती. तक्रारदार मुलींवरच पोलीस दबाव टाकत होते त्याच रात्री ते तिला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी आग्रह करत होते. तिला तिच्या घरी ही जाऊ दिल्या जात नव्हते. त्यामुळे तिने नाईलाजाने आपले कपडे काढले. तिने कपडे काढल्यानन्तर पोलिसांच्या समोरच काहीजण व्हिडीओ काढून घेत होते पण पोलिसांनी कोणाला रोखले नाही.
त्यामुलींने कपडे काढल्यावर बराच वेळ तिला तसेच रोखून धरण्यात आले. यासंबधी महाराष्ट्र पोलीस यांनी सांगितले की आम्ही त्या मुलीचे तक्रार ऐकून घ्यायला गेलो होतो आम्ही तिला रात्री स्टेशनमध्ये घेऊन गेलो नाही फक्त आम्ही तिला पोलीस स्टेशन ला येऊन तक्रार नोंदवा म्हणालो. याप्रकरणी मुंबई पोलिसांची भूमिका आपल्या कर्मचाऱ्याच्या बचावाची वाटली.
नेमकं त्यादिवशी काय घडले याची माहिती घेतली असता असे समजून आले की सिगारेट च्या देवाण घेवाण वरून वाचमेन आणि मॉडेल मेघा यांच्यात बाचाबाची झालेली त्यावरून पोलिसांना बोलवण्यात आले आणि नंतर चा किस्सा घडला.या घटनेला अनेक अंगाने व्हायरल केले जात आहे. पण वास्तव हे वरीलप्रमाणे आहे.