भारतीयांना भक्ती दान धर्म करण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे इथे असलेल्या साधू साध्वीना चांगलच महत्व आहे. अनेक साधू साध्वीना लाखो करोडो भक्त आहेत. भारतीय त्यांच्या आयुष्यात भक्तीभावाला चांगलेच महत्व देतात. सहसा साधू साध्वी हे जेष्ठ असतात. पण आज आपण अशा साध्वी विषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचे वय अवघे 21 वर्षे आहे आणि भक्तांची संख्या मात्र लाखोंमध्ये आहे. बघूया या साध्वी विषयी माहिती…
या 21 वर्षीय साध्वी आहेत जया किशोरी. जया किशोरी यांचे वय अवघे 21 वर्षे आहे. जया किशोरी या राजस्थानच्या सुजानगढ येथील आहेत. जया यांचा जन्म 1996 साली गौड ब्राम्हण परिवारात झाला. जन्मच गौड ब्राहन परिवारात झाल्याने घरात लहानपणी पासून जया याना सुद्धा भक्तीची आवड लागली. जयाचा कल हा लहानपणी पासून कृष्ण भक्तीकडे होता. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षीच जया संस्कृत मध्ये लिंगाष्टकम, शिव तांडव स्तोत्रम, रामाष्टकम आदी स्रोत गायच्या. दहाव्या वर्षी एकटीने सुंदर कांड चे पाठ केला. तेव्हापासून जयाला एक वेगळी ओळख मिळायला सुरुवात झाली. पण जयाने शिक्षणही सुरु ठेवले. जयाने कोलकता येथील महादेवी बीडला वर्ल्ड अकॅडमी मधून शिक्षण घेतले.
जयाने सुरुवातीला दीक्षा पंडित गोविंदराम मिश्र यांच्याकडून घेतली. पंडित मिश्र जयाला राधा म्हणून बोलवायचे. त्यांनीच जयाचे कृष्ण प्रेम बघून तिला किशोरी जी अशी उपाधी दिली होती. आता जयाला भक्त किशोरी जी म्हणूनच ओळखतात.
जयाचे ‘नानी बाई का मायरा, नरसी का भात’ हे सत्संग खूप प्रसिद्ध आहे. जयाच्या या सत्संगाला लाखो भक्तांची गर्दी होते. जया सोशल मीडियावर पण चांगलीच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या फेसबुक पेजला तब्बल 8 लाख लाईक्स आहेत.
जयाच्या सत्संगामधून जो पैसा जमा होतो तो नारायण सेवा ट्रस्ट, उदयपूरला दान केला जातो. या दानातून ट्रस्ट अपंगांना मदत करते.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..