क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो, कधी के होईल सांगता येत नाही. क्रिकेट मध्ये रोज नवनवीन रेकॉर्ड बनतात आणि तुटतात. एका क्षणाला असे वाटते की सहज एक टीम मॅच जिंकेल पण दुसऱ्या क्षणी ती हरते. यामुळेच तर क्रिकेटला जगभरात खूप पसंत केले जाते. क्रिकेट मध्ये कधी कधी एवढे रोमांचक क्षण येतात की त्याला मर्यादा राहत नाहीत. क्रिकेट मध्ये शून्य हा असा आकडा आहे जिथे कोणताच फलंदाज आऊट होऊ इच्छित नाही. जगभरात असे फक्त 3 फलंदाज आहेत जे आपल्या क्रिकेट करिअर मध्ये अजूनपर्यंत एकदाही शून्यावर आऊट नाही झाले. चला तर आज खासरेवर जाणून घेऊया कोण आहेत हे फलंदाज…
केप्लर वेसेल्स-
24 सप्टेंबर 1957 ला जन्मलेले केप्लर वेसेल्स हे दक्षिण आफ्रिका चे माजी क्रिकेटपटू आहेत. आपल्या करिअर मध्ये केप्लर हे ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका या दोन्ही संघाकडून खेळले आहेत. केप्लर हे साऊथ आफ्रिकेचे कॅप्टन म्हणून खेळले आहेत. साऊथ अफ्रिका टीमचे कॅप्टन बनण्याच्या अगोदर ते ऑस्ट्रेलियाकडून 24 टेस्ट मॅच खेळले आहेत. त्यांनी आपल्या 10 वर्षाच्या करिअर मध्ये 109 वनडे मॅच खेळले ज्यामध्ये त्यांनी एक शतक आणि 26 अर्धशतकासोबत 3367 रन बनवले. वनडे मध्ये त्यांचा सर्वोच्च स्कोर हा 107 रन आहे. वेसेल्स आपल्या करिअर मध्ये कधीच शून्यावर आऊट नाही झाले. केप्लर हे जगातील पहिले खेळाडू आहेत ज्यांनी दोन देशाकडून एकदिवसीय सामन्यात सहभाग घेतला.
शमीउल्लाह शेनावारी-
अफगाणिस्तानची टीम अजून क्रिकेटमध्ये आपले नाव खूप जास्त काही कमवू शकली नाही. पण या टीमचे फलंदाज असलेले शमीउल्लाह शेनावारी हे असे फलंदाज आहेत जे आपल्या क्रिकेट करिअर मध्ये आतापर्यंत एकदाही शून्यावर आऊट नाही झाले. शमीउल्लाह हे 7 वर्षे अफगाणिस्तान टीमकडून क्रिकेट खेळले. शेनावारी यांनी 69 मॅच मध्ये 1578 रन बनवले आहेत आणि ते 7 वेळा नाबाद सुद्धा राहिले आहेत. वनडेमध्ये त्यांचा सर्वोच्च स्कोर 96 रन आहे ज्यात त्यांच्या 11 अर्धशतकांचा समावेश आहे.
यशपाल शर्मा-
11 ऑगस्ट 1954 रोजी जन्मलेले यशपाल शर्मा हे एक माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. पंजाबमध्ये जन्मलेले यशपाल शर्मा भारतीय टीममध्ये फलंदाज आणि प्रसंगी विकेटकीपर म्हणून खेळले आहेत. 2 ऑगस्ट 1979 रोजी त्यांनी इंग्लंड विरुद्ध ओल्या टेस्ट करिअरची सुरुवात केली, तर 13 ऑक्टोबर 1978 ला पाकिस्तान विरुद्ध वनडे मध्ये पदार्पण केले. भारताचे हे माजी खेळाडू सुद्धा या लिस्टमध्ये शामिल आहेत. यशपाल यांनी आपल्या करिअर मध्ये 42 वनडे सामन्यात 833 रन बनवले. त्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे मध्ये त्यांचा सर्वोच्च स्कोर 89 आहे. भारताचा हा फलंदाज वनडे मध्ये कधीही शून्यावर आऊट नाही झाला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…