अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंह हे आपल्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. पण नुकतेच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोघांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री सुद्धा धम्माल असल्याचे दिसून आलं आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोघे एकाच स्टेजवर दिसले. या कार्यक्रमात ‘पद्मावत’ या सिनेमातील ‘खलीबली’ या गाण्यावर रणवीर थिरकताना दिसला तर दीपिकानेही त्याच्या स्टेप्स फॉलो करत धमाल डान्स केला. या दोघांचा हा डान्स चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. बघा रणवीर-दीपिकाचा स्टेजवरचा ‘हबीबी…’ गाण्यावरील धम्माल डान्स..
Loading...