मंत्री म्हणलं की एकदम राजेशाही थाट. कुठे जायचे असेल तर मागे पुढे गाड्यांचा ताफा. लाल दिवा बंद झाला नाही तर हाच ताफा आवाज करत जायचा. एखाद्या मंत्र्याबद्दल विचार केला तर सर्वसामान्यांच्या मनात अशीच काहीशी इमेज त्यांची असते. बरेच राजकारणी कुठे जात असताना रस्त्यात अपघात झाला तर मदत करतात. असे अनेक उदाहरणं आजपर्यंत आपण बघितले आहेत. पण आज महाराष्ट्रातील एका मंत्र्याने चक्क एका दुचाकीला धडक देऊन जाणाऱ्या कारला पाठलाग करून पकडले आहे.
हे मंत्री आहेत शिवसेनेचे सासवड येतील आमदार, महाराष्ट्राचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे. शिवतारे हे आज आज सासवड वरून पुण्याला यायला निघाले होते. त्यावेळी बापदेव घाटाच्या अलीकडे भिवरी या गावानजीक आला असता एका विरुध्द दिशेने आलेला क्रेटा कारने एका दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर दोघे जण खाली पडले, पण या क्रेटा कार वाल्याने त्या दुचाकी वरील व्यक्तीना उचलण्याऐवजी तेथून पळ काढला.
त्याच वेळी शिवतारे यांचा ताफा तेथून जात होता. त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या कारचा पाठलाग करत त्या कारला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या ताफ्यातील इतरांनी जखमींना मदत करत दवाखान्यात हलवले.
पाठलाग करून पकडलेल्या कारमध्ये दोघे जण होते. दोघेही दारू पिलेले असल्याचा संशय त्यांना आला. त्यातील एकाकडे पोलिसांचे ओळखपत्र सापडले. शिवतारे यांच्या या फ्लिमी स्टाईल पाठलागाने आरोपींना पकडून दिल्यानंतर त्यांना महाराष्ट्राचा जेम्स बॉण्ड मंत्री म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
कुठेही अपघात झाल्यानंतर तेथील जखमींना माणुसकीच्या नात्याने मदत करणे प्रत्यकाचे कर्तव्ये असते. पण अशाप्रकारे धडक देऊन पळून जाणे चुकीचे आहे.