पाब्लो हे नाव अनेकांना परीचीत आहे त्याचे मुख्य कारण नेटफ्लिक्स वरील नार्कोस हि सिरीज आहे. पाब्लो एस्कोबार हा फोर्ब्स नुसार जगातील श्रीमंत व्यक्ती च्या यादीत सातव्या स्थानी होता. परंतु पाब्लोचे काम हे अमेरिकेत ड्रग पाठविणे हे आहे. रोज तब्बल २५ टन ड्रग तो अमेरिकेत तस्करी करत असे. पाब्लोचा जन्म कोलंबिया मध्ये १९४९ मध्ये एका गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणापासून त्याचे स्वप्न हे कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष होणे होते. परंतु या करिता त्याने सुरवात हि चोरी आणि स्मगलिंगने केली होती. सत्तरच्या दशकात तो जगातील सर्वात मोठा ड्रग तस्कर बनला होता. आज खासरे वर बघूया पाब्लो एस्कोबार विषयी काही खासरे गोष्टी
पाब्लो दररोज अमेरिकेत १५ ते २५ टन कोकेन पाठवत होता. संपूर्ण जगात ८०% कोकेन हा पाब्लोपाठवत होता. त्याकरिता तो विमान आणि पाणबुड्याचा देखील वापर करत होता. त्याच्या कडे दोन पानबुड्या म्हणजेच सबमरीन होत्या. पाब्लोला दर महिन्याला तब्बल २५०० हजार डॉलरचे म्हणजे जवळपास २ लाख रुपयाचे रबर हे नोट बांधायला लागत होते. यावरून विचार करा त्याच्या कडे किती रोख पैसा असेल.
पाब्लोला रॉबिनहूड म्हणून लोक ओळखत असे कारण तो त्याच्या कडील पैश्याचा काही भाग गरीब भागात घरे,दवाखाने, शाळा, फुटबाल ग्राउंड,चर्च इत्यादी बनविण्याकरिता वापरत असे. पाब्लोच्या काळात त्याच्या कडील गुंडांनी एकूण ४००० लोकांचा बळी घेतला होता यामध्ये राजकारणी, पोलीस अधिकारी इत्यादी सुध्दा होते. पाब्लोचे पैसे हे मोठ्या गोदामात ठेवण्यात येत असे. दरवर्षी त्याचे २ बिलियन डॉलर १२००० करोड हे उंदीर आणि उधळी लागून खराब होत असे.
१९९१ साली पाब्लोची मुलगी अचानक आजारी पडली तिला निमोनिया झाला होता. तिला थंडी वाजत असल्याने पाब्लोनि तिला उब देण्याकरिता तब्बल एका रात्रीत २ मिलियन डॉलर म्हणजे १८ करोड रुपये जाळले होते. पाब्लोनि अटक होण्याकरिता स्वतःचे तुरंग स्वतः बांधणार असे सरकारला कळविले आणि त्या तुरंगात त्याने स्वतःकरिता स्विमिंग पूल, फुटबॉल ग्राउंड, धबधबा इत्यादी बनवून घेतले होते. टेलिस्कोप द्वारे तो स्वतःच्या कुटुंबाला या जेल मधून बघत होता.
palto or plomo हे त्याचे मुख्य वाक्य कुठल्याही अधिकाऱ्यास किंवा राजकारण्यास तो हे वापरत होता. याचा अर्थ चांदी (पैसा) का शीस (गोळी) असा होतो. जो तयार होत नसे त्याचा गळा कापून तो त्यांचा खून करायचा. पाब्लो कडे स्वतःच्या मालकीचे तब्बल ८०० अलिशान घर होती. अमेरिकेतील पैसा कोलम्बियामध्ये आणण्य करिता त्याला विमानाचा वापर करावा लागत असे. प्रत्येक आठवड्याला तो ४२० मिलियन अमेरिकन डॉलर कमवत होता.
२ डिसेम्बर १९९३ रोजी त्याला मारण्यात आले. त्याच्या अंत्यविधीस तब्बल २५ हजार लोक उपस्थित होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याला पोलिसांनी ठार केले परंतु त्याचा भाऊ सांगतो कि पाब्लोनी स्वतः स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्याला पोलिसांच्या शरण जायचे नव्हते. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.