Bigg Boss हा शो नेहमीच चर्चेत असतो. कधी यामध्ये होणाऱ्या वादावरून तर कधी बिग बॉस मध्ये असलेल्या काही स्पर्धकांमुळे. यावर्षी चालू असलेल्या १२व्या सिजनमध्ये अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. त्यातील सर्वाधिक चर्चिलेले नाव म्हणजे अनुप जलोटा. अनुप जलोटा हे आपल्या गर्लफ्रेंड जसलीन मथारू सोबत सहभागी झाले आहेत. यावर्षीच्या बिग बॉसचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस स्पर्धकांमध्ये दोन टीम बनवण्यात आल्या असून यामध्ये काही सिंगल स्पर्धक आणि काही स्पर्धकांच्या जोड्या बनवण्यात आल्या आहेत. अनुप जलोटा यांनी बीग बॉस सीजन १२ च्या प्रीमिअर मध्ये आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. याशिवाय अनुप जलोटा यांच्या मानधनाची देखील खूप चर्चा सुरू आहे.
अनुप जलोटा यांनी यावर्षीच्या बिग बॉस मध्ये सर्वाधिक मानधन घेतले आहे. बिग बॉस मध्ये कलाकारांना त्यांच्या प्रसिद्धी नुसार मानधन दिले जाते. ६५ वर्षीय भजन सम्राट असलेले अनुप जलोटा यांना एका आठवड्यासाठी दिले जाणारे मानधन ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
या शोचे युवा चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. पण हा शो जेष्ठानी सुद्धा पाहावा यासाठी अनुप जलोटा यांना या शोमध्ये घेण्यात आलं आहे. त्यांच्या शो मध्ये असण्याने शोचा टीआरपी वाढण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळेच त्यांना सर्वाधिक मानधन देण्यात आले आहे. बॉलिवूडलाइफ डॉट कॉमच्या माहितीनुसार अनुप जलोटा यांना एका आठवड्याचे तब्बल 45 लाख रुपये मानधन देण्यात येत आहे. अनूप जलोटा यांच्यानंतर सर्वाधिक फी आकारणारा करणवीर बोहरा असून करण एका आठवड्याचे 20 लाख रुपये फी आकारतो. तिसऱ्या क्रमांकावर ‘ससुराल सिमर का’ मधील सून दीपिका कक्कड आहे.
कोण आहेत अनुप जलोटा?
भजन गायनात अनुप जलोटा हे नाव अनेक दशके झाली प्रसिद्ध आहे. त्यांच्या वडिलांपासून भजन गायन चालत आले आहे. त्यामुळे अनुप जलोटा यांचा गायनात कोणी हात धरू शकत नाही. त्यांची अनेक भजन प्रसिद्ध आहेत. अनेकांची सकाळ किंवा धार्मिक कार्यक्रम जलोटा यांच्या गाण्यांशिवाय पूर्ण होत नाही.
अनुप जलोटा यांचे तीन लग्न झाली आहेत. पहिले लग्न त्यांनी त्याची शिष्य असणाऱ्या सोनाली शेठ सोबत झाले होते त्यांनी दोघांनी अनेक संगीत कार्यक्रम हि अनुप आणि सोनाली जलोटा या नावाने केली. पण हे लग्न जास्त काळ टिकले नाही. त्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर बीना भाटिया हिच्या सोबत लग्न केले. हे पण लग्न जास्त काळ टिकले नाही त्यानंतर त्यांनी मेधा गुजराल हिच्या सोबत लग्न केले आणि हिच्या पासून त्यांना आर्यमन नावाचा मुलगा आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…