दिल्ली, पंजाब, उत्तराखंडमधल्या हजारो शेतकऱ्यांची ही किसान यात्रा 23 सप्टेंबरला हरिद्वारपासून सुरु झाली होती. हि यात्रा दिल्लीत पोहचणार होती त्यामुळे पोलिसांनी आधीच त्यांना दिल्लीत पोहचू द्यायचे नाही म्हणून नियोजन करून ठेवले होते. आंदोलनकर्त्यांना दिल्लीत पोहचु द्यायचं नाही हा त्यांचा इरादा होता हे लक्षात येते. दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरच शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. तिथे पोलिसांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष झालेला बघायला मिळाला. पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आधी पाण्याचे फवारे मारले, त्यानंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी यावर चांगलाच संताप व्यक्त केला. पोलिसांवर आणि सरकारवर सर्व स्तरातून टीका करण्यात आली.
या घटनेचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले. पण यामध्ये कम्युनिस्ट नेत्या कविता कृष्णन यांनी एक फोटो ट्विट करून त्याला काश्मीरच्या वादाची जोड दिली. कविता कृष्णन यांच्या या ट्विटमुळे त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. कविता कृष्णन यांनी जो फोटो ट्विट केला आहे त्यामध्ये एक शेतकरी हाथात विट घेऊन पोलिसासमोर उभा आहे. हा फोटो त्यांनी कालच्या आंदोलनादरम्यानचा सांगत ट्विट केला आहे.
त्यांनी या ट्विटमध्ये ‘या शेतकऱ्याने जर तुम्हाला रागात असे केल्याचे वाटत असेल आणि त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत असेल तर मी अपेक्षा करते कि काश्मीरच्या मुलांना पण तुम्ही अशीच सहानुभूती द्याल’. या ट्विटवर सुद्धा त्यांच्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला होता.
पण कविता कृष्णन यांनी शेअर केलेला हा फोटो कालच्या आंदोलनातील नसून जुना असल्याचे समोर आले आहे. २०१३ साली मुजप्परनगर येथे झालेल्या दंगलीतील हा फोटो आहे. उत्तर परदेशातील खेरा मेरठ येथील एका शेतकऱ्याचा आणि पोलिसाचा हा फोटो आहे. त्यामुळे कविता कृष्णन यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…