तानाजी मालुसरे यांचं नाव घेतलं कि प्रत्येकाच्या मनात विचार येतो “आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं’ या वाक्याचा. तानाजी मालुसुरेंचे हे वाक्य इतिहासात अजरामर झालेलं आहे. त्यांच्या जाण्याने शिवाजी महाराजांना देखील प्रचंड दुःख झाले होते. तेव्हा महाराजांनी ‘गड आला पण माझा सिंह गेला’ असे भावनिक उद्गार काढले होते. तानाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी, त्यामुळे ते महाराजांच्या अत्यंत विश्वासातले होते. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींंमध्ये महाराजांबरोबर होते. सुभेदार तानाजी मालुसरे. शिवछत्रपतींशी एकनिष्ठ असलेल्या तानाजी मालुसरेंचं शौर्य लवकरच मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.
‘लोकमान्य एक युगपुरुष’ या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. अजय देवगणने ट्विटरवर एक फोटो शेअर केला असून त्यात तो दिग्दर्शक ओम राऊतसोबत प्रार्थना करताना दिसतो आहे. अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारणार आहे. तानाजी द अनसंग वॉरियर असं या सिनेमाचं माव आहे. या सिनेमात तानाजी मालुसुरे यांची भूमिका महत्वाची आहेच सोबत शिवाजी महाराजांची भूमिका देखील तेव्हडीच महत्वाची असणार आहे. त्यामुळे अजय देवगण सोबत या सिनेमात अजून कोणता अभिनेता असणार याबाबत उत्सुकता होती.
शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अजय देवगणनेच अभिनेत्याचं नाव सुचवलं असून तो अभिनेता आहे सैफ अली खान. तानाजी द अनसंग वॉरियर या सिनेमातील शिवाजी महारांची महत्वपूर्ण भूमिका सैफ अली खान साकारण्याची खूप शक्यता आहे. सैफ अली खान या भूमिकेबाबत गांभीर्याने विचार करत आहे. सोबतच काजोल सुद्धा तानाजी मालुसुरेंच्या पत्नीची भूमिका साकारण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी 9 नोव्हेंबर, 2019 ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरु झाले आहे. गेल्या वर्षी या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. या सिनेमाचे बजेच जवळपास १५० कोटींचे आहे. यातील सर्वाधिक खर्च वीएफएक्सवर करण्यात येणार आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…