सोशल मीडियावर अनेक गोष्टीची कोणतीही खात्री न करता त्या गोष्टी वायरल केल्या जातात. आता एक सोशल मीडियामध्ये व्हिडीओ वायरल होत आहे. त्या व्हिडीओ मध्ये असा आरोप करण्यात आला आहे कि तनुश्री दत्ता हिच्यावर नाना पाटेकर व राज ठाकरे यांनी हल्ला करवला. २००८ मधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. पण या व्हिडीओ चे वास्तव अत्यंत वेगळे आहे. ते वास्तव आज आम्ही आपल्या समोर घेऊन आलो आहोत.
तनुश्री दत्ता हि नाना पाटेकर यांच्या हॉर्न ओके प्लिज चित्रपटात एक आयटम गाणे करत होती. तेव्हा तिने नाना पाटेकरवर छेडछाडीचे आरोप लावले आणि चित्रपटाच्या सेट वरून ती निघून गेली. त्याच वेळी तिच्या गाडी भोवती जमाव जमलेला दिसतो आणि त्या जमावातील फक्त दोन व्यक्ती गाडीवर हल्ला करताना दिसत आहेत. या घटनेला घेऊन तनुश्री दत्ता च्या समर्थानात अनेकजण उतरले पण हे वास्तव नाही आहे. या घटनेचा आणि नाना पाटेकर व राज ठाकरे यांचा काही एक संबंध नाही आहे.
वास्तव घटना अशी आहे. आपण व्हिडीओ मध्ये जे लोक तनुश्री दत्ताच्या गाडीवर हल्ला करत आहेत त्यात एक रिपोर्टर तर दुसरा आहे कॅमेरामॅन हे दोन लोक तनुश्री दत्ताच्या कार वर हल्ला करताना दिसत होते. तर या लोकांबद्दल आम्ही माहिती घेतली तर यातील रिपोर्टर व कॅमेरामन हे सहारा समय या वृत्तवाहिनीचे होते. कॅमेरामनचे नाव पवन भारद्वाज तर रिपोर्टरचे नाव आदित्य असे असून त्याने त्यादिवशी काय झाले हे सांगितले आहे.
पवन भारद्वाज याच्या म्हणण्यानुसार त्यादिवशी तनुश्री स्टुडिओ मधून येताना त्याने तिचे फुटेज पवन भारद्वाज घेण्यासाठी गेले असताना तनुश्री भारद्वाज हिच्या वडिलांनी कॅमेरामन जवळील कॅमेरा घेऊन तोडून टाकला. त्यामुळे कॅमेरामन चा राग अनावर झाला आणि त्याने कॅमेरा तोंडल्याची भरपाई मागितली. पण तिच्या वडिलांनी व तनुश्री यांनी त्यांना भरपाई काय त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता कार मध्ये बसून दरवाजा बंद केला. त्यामुळे संतापून पवन भारद्वाज याने तेव्हा रागात आपल्या तुटलेल्या कॅमेराने कार वर हल्ला केला. त्यांच्यासोबत त्यांचा एक सहकारी पण होता.
या घटनेचा संबध नाना पाटेकर आणि राज ठाकरे यांच्याशी काही एक नाही सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चुकीच्या मॅसेज सहित पसरतो आहे. आणि त्यावरून लोक नाना पाटेकर आणि राज ठाकरे याना खलनायक ठरवू पाहत आहेत. पण खासरेच्या पडताळणीत हा व्हिडीओ चुकीचा असल्याचे दिसून येत आहे. हे फक्त कॅमेरामन व तनुश्री दत्ता हिच्या वडिलांचे भांडण आहे ज्याला लोक चुकीचे वळण देत आहेत.आपण हि माहिती सर्वांपर्यंत पोहचवून नाना पाटेकर आणि राज ठाकरे वर होणारे चुकीचे आरोप खोडावेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…