2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करत तनुश्री दत्ताने खळबळ उडवून दिली आहे. नुकतेच ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या एका मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला आहे. नाना पाटेकरांनी सर्वांसमोर माझ्याशी गैरवर्तन केलं, तरी ते आजही बॉलिवूडमध्ये काम करत आहेत अशी भावना तनुश्रीने व्यक्त केली होती. एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु असताना नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं आणि कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे सांगितले. मी इतकी अनकम्फर्टेबल झाले, की अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. असं तनुश्रीने यावेळी सांगितले.
या मुलाखतीत नाना पाटेकर यांच्या सोबत तनुश्री दत्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर सुद्धा गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती, ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात, असं ती यावेळी म्हणाली. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच मनसे कार्यकर्त्यांनी माझी कार फोडली असा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. यावेळी तिने थेट राज ठाकरेंवरच आरोप केले आहेत.
आज खासरेवर जाणून घेऊया नाना पाटेकर आणि राज ठाकरेंवर हे गंभीर आरोप करणारी तनुश्री दत्ता आहे तरी कोण?
तनुश्री दत्ताचा जन्म 19 मार्च 1984 रोजी झारखंड मधील जमशेदपुर मध्ये झाला.तीणे येथेच आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि पुढे ज्युनिअर कॉलेजला पुण्यात प्रवेश घेतला. तनुश्रीचे वडील तपन दत्ता हे भारत जीवन बीमा निगम चे कर्मचारी होते. तर तिची आई गृहिणी आहे.
पुण्यात कॉलेजला असताना तनुश्रीने अनेक स्थानिक मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. 2003 साली फेमिना मिस इंडिया झाल्यानंतर तनुश्रीने भरारी घेतली. त्यांनतर तिने अनेक देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व देखील केले. तिला मोठ्या सिनेमांचे ऑफर मिळायला सुरुवात झाली. 2003 साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने 2005 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तनुश्रीचा ‘आशिक बनाया आपने’ हा सिनेमा चांगलाच गाजला. त्यानंतर तिने चॉकलेट, ढोल, रिस्क, स्पीड या सिनेमात काम केले. 2010 नंतर मात्र तनुश्री बॉलिवूडपासून दूर गेलेली दिसत आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…