भारतीयांना नेहमीच जुगाड करण्याची सवय असते. जुगाड करण्यासाठी भारतीयांची कल्पनाशक्ती सुसाट धावते असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मग अगदी संकटात अडकलेल्या क्षणी असो किंवा दैनंदीन कामे सोप्पी करण्यासाठी असो जुगाड करुन काम करण्यात भारतीयांचा हाथ कोणी धरू शकत नाही . अशाच एका जुगाडू भारतीय कुटुंबाचा व्हिडीओ सध्या ट्विटवर व्हायरल होत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ रिट्वीट केल्याने अनेकांचे लक्ष या व्हिडीओकडे वेधले गेलेले आहे. त्यामुळं हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
हा व्हिडिओ आहे एका शेतकरी कुटुंबाच्या ‘डोकॅलिटी’ चा. या व्हिडीओमध्ये एका स्पेंल्डर मोटरसायकलच्या साहाय्याने एक शेतकरी कुटुंब चक्क भुईमुगाच्या शेंगा रोपाच्या मुळापासून वेगळ्या करताना दिसत आहे. शेतकऱ्यांना उपटलेल्या भुईमुगाच्या शेंगा या हाताने तोडण्यासाठी बराच वेळ लागतो. या शेतकरी कुटुंबाने यावर हा अफलातून शक्कल लढवत हे जुगाड शोधून काढलं आहे. उपटलेल्या भुईमुगाच्या शेंगा या हाताने न तोडता टू साईड स्टॅण्डवर बाईक लावून. गाडी सुरु ठेऊन मागील चाकाच्या मदतीने वेगळ्या केल्या जात आहेत. हा व्हिडीओ महिंद्रांच्या अविनाश नावाच्या एका व्यक्तीने ट्विट केला आहे. ज्यामध्ये त्याने महिंद्रा यांना टॅग केले आहे.
या शेतकऱ्याने गाडीमध्ये देखील कुठलाही बदल केला नाहीये. फक्त कल्पनाशक्तीचा वापर करून हि आयडिया त्यांनी शोधून काढली आहे. महिंद्रांनी अविशानचा व्हिडीओ कोट् करुन त्याच्या वक्तव्याशी सहमती दर्शवत हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ कोट् करताना महिंद्रा यांनी लिहिले आहे की, ‘भन्नाट, हा आहे माझा भारत, काहीही वाया न घालवणे म्हणजे काटकसर. मग ती काटकसर कुठल्याही प्रकारची असो ऊर्जेचे किंवा यंत्राची.’ महिंद्रांच्या या ट्विटला शेकडोच्या संख्येने रिट्विट मिळाले आहेत तर हजारोंनी हे ट्विट लाईक केले आहे.
बघा व्हिडीओ-
@anandmahindra Sir, ths farmer should be rewarded for this Jugaad !! We are never short of these!! Hat's off ! No Modification of the 2 wheeler also. pic.twitter.com/49aDi88EZb
— Avinash (@Avinash_m06) September 10, 2018
या शेतकऱ्याच्या कल्पनाशक्तीला खासरेचा सलाम.. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…