1905 च्या आसपासच्या काळात राजा महाराजा असायचे. त्यावेळी आखाड्याना खूप महत्व असायचे. एकापेक्षा एक वरचढ पैलवान त्याकाळी असायचे. मोठमोठ्या पैलवानांमध्ये कुस्तीचे मुकाबले व्हायचे. मातीच्या आखाड्यातील त्या कुस्त्यांमध्ये वेगळीच मजा असायची.
रुस्तुम ए हिंद रहीम बक्ष, दतीयाचे गुलाम मोहिउद्दीन, भोपाळचे प्रताप सिंह, मुलतानचे हसन बक्ष या प्रसिद्ध कुस्तीपटू़ंचा तो काळ होता.
पण एक पैलवान आला, जो सर्वाना अपवाद होता. तो होता मध्ये प्रदेशातील दतीया जिल्ह्यातील. उंची फक्त 5 फूट 7 इंच. तो पैलवानांच्या कुटुंबातील एक छोटासा मुलगा होता. पिळदार शरीरयष्टी, भुजांमध्ये अशी ताकत की मोठमोठ्या पैलवानांना धूळ चारली. त्याच्या येण्याने सर्वत्र खळबळ उडाली. त्याच्यासारखा तो एकटाच असेल असे बोलले जाऊ लागले. तो आपल्या पेक्षा दीड फूट उंच पैलवानाला देखील उचलून आपटायची ताकत ठेवायचा.
तो पंजाबचा मुलगा होता. पण मध्ये प्रदेशातील दतीया जिल्ह्यातील पैलवान घराण्यातील. दुलार येथील घरी आणि गावात त्याला गामा म्हणून ओळखले जायचे. त्याचे नाव होते गुलाम मोहम्मद बक्ष. त्याचे वडील मोहम्मद अजीज बक्ष आणि भाऊ इमाम बक्ष हे देखील पैलवान होते. वडिलांनी त्याला लहानपणी पासूनच दंड आणि बैठका मारायला शिकवले. दोघे भाऊ लहानपणीच पंजाबचे प्रसिद्ध कुस्तीपटू पैलवान माधोसिंह यांच्यासोबत कुस्ती खेळायचे. कुस्तीतले डावपेच त्यांनी इथूनच शिकायला सुरुवात केली.
गामा पैलवान ज्यावेळी पाच वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी दतीयाचे राजा होते भवानीसिंह. ते गामाच्या वडिलांना चांगलं ओळखायचे. त्यांनी गामा आणि भावाच्या पुढच्या ट्रेनिंगची जबाबदारी घेतली. त्याकाळी राजांच्या दरबारात कुस्त्या व्हायच्या. गामाने खूप मेहनत घेतली. तो दिवसभरात 5000 दंड आणि 3000 बैठका मारायचा. तो सोबतच 6 कोंबड्या खायचा आणि त्यासोबत 10 लिटर दुध आणि अर्धा लिटर तूप प्यायचा. वरून बदामाचे टॉनिक.
गामाने जवळपास 50 वर्ष व्यावसायिक कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेतला. पण त्याचं रेकॉर्ड म्हणजे तो एकदाही हरला नाही. त्याने जगभरात आपली ओळख निर्माण केली आणि जगभरातील कुस्तीपटूंना हरवले.
सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून एक स्पर्धा जोधपूरच्या राजांनी आयोजित केली होती. त्यावेळी गामाने 400 पैलवानांना हरवले होते. या स्पर्धेनंतर त्याची देशभरात ओळख निर्माण झाली.
गामा पैलवानाची ट्रेनिंगच एक रिसर्चचा टॉपिक होऊन बसली आहे. ब्रूस ली हा गामा पैलवानाचा खूप मोठा फॅन होता. त्याने गामाच्या ट्रेनिंग रुटीननुसार आपल्या ट्रेनिंगचं रुटीन बनवलं होतं. गामाने ब्रूस लीला दंड बैठक आणि योगाचे काही आसन शिकवले होते. जे ब्रूस लीने आयुष्यभर पाळले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…