बॉलीवूड सेलिब्रिटींच्या मुलामुलींची नेहमीच छोट्या छोट्या गोष्टीवरून चर्चा होत असते. शाहरूख खानची मुलगी सुहाना तर यामध्ये आघाडीवर असते. तिचे पुलचे फोटो किंवा हॉट फोटो व्हायरल न होताही ती चर्चेत असते. सर्वच सेलेब्रिटीच्या बाबतीत असेच घडते. त्यांच्या मुलामुलींना सामान्य जीवन जगणे यामुळे अडचणीचं ठरते. सेलिब्रिटींची मुलं मुली काय करतात, काय खातात पितात हे जाणून घेण्यासाठी अनेकांना उत्सुकता असते. ते कोणत्या शाळेत जातात, काय शिकतात याबद्दलही जाणून घ्यायचे असते.
सेलिब्रिटींची मुलं मुली सुद्धा शाळेत जातात. मुंबईतील एक शाळा यासाठी खूप प्रसिद्ध असून त्या शाळेत जास्तीत जास्त सेलेब्रिटीची मुलं शिक्षण घेतात. या शाळेचं नाव आहे धीरूभाई अंबानी स्कुल. ही शाळा स्व. धीरूभाई अंबानी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बनवलेले आहे. या शाळेच्या फाउंडर आणि चेअरपर्सन नीता अंबानी या आहेत. अंबानी कुटुंबाचे सर्वच बॉलीवूड सेलेब्रिटीसोबत खूप जवळचे संबंध आणि मैत्री आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची शाळा म्हणल्यावर आपल्या मनात प्रश्न येणे साहजिक आहे की या शाळेची फिस किती असेल. आणि त्यात भर म्हणजे सर्व मोठमोठ्या बॉलीवूड सेलेब्रिटिंचे मुलं मुली शिकत असल्याने ही फिस खूप जास्त असणार यात शंकाच नाही. चला तर जाणून घेऊया किती आहे या शाळेची फिस.
धीरूभाई अंबानी स्कुलची फिस एवढी आहे की ज्यामध्ये कानपुर मधील पूर्ण मोहल्ला शिक्षण घेऊ शकतो. धीरूभाई अंबानी स्कुलमध्ये लोअर केजी ते सातवी पर्यंतची फिस तब्बल 1 लाख 70 हजार रुपये आहे. अमी आठवी ते दहावी पर्यंत फिस 1 लाख 85 हजार रुपये आहे. फिस जास्त असली तरी येथील विद्यार्थी मोठमोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये पुढे शिक्षण घेतात.
या शाळेत कोण कोण शिक्षण घेते किंवा घेतलेले आहे?
शाळेत शिक्षण घेणाऱ्यांमध्ये अर्जुन तेंडुलकर, सारा तेंडुलकर, सुहाना आणि आर्यन खान, आराध्या बच्चन, जान्हवी कपूर, रेहान आणि रिदान रोशन, इरा अमीर खान, शक्या आणि अकिरा अख्तर यांचा समावेश आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…