2017 साली झालेल्या यूपीएससीच्या लेखी परीक्षा पास झालेल्या परीक्षार्थींचे यावर्षी मे मध्ये निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये एका उत्तर प्रदेशातील झांसीच्या आरिफ खानने ही परीक्षा पास केली. त्यांना या परीक्षेत 850 वी रँक मिळाली. पण त्यांची निवड ज्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर झाली त्याची मात्र सर्वत्र खूप चर्चा होत आहे. जाणून घेऊया काय दिले होते आरिफ यांनी उत्तर.
IAS परीक्षेच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर विचारले जातात. या प्रश्नांचे उत्तर देताना उमेदवारांचा कस लागतो. निवड झाल्यानंतर जबाबदारी सुद्धा त्याच स्तरावरची असल्याने त्यांना असे प्रश्न विचारून त्यांची पात्रता तपासली जाते. मे 2018 मध्ये 2017 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये 850 व्या रँकसह पास झालेल्या अरीफला विचारण्यात आलेला प्रश्नही सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
आरिफ खानने यूपीएससी लेखी परीक्षेत यश मिळवले. त्यानंतर त्यांना इंटरव्ह्यूमध्ये बलात्काराबाबत प्रश्न विचारण्यात आला. बलात्काऱ्याला फाशी देणं योग्य की अयोग्य असे आरिफ यांना विचारण्यात आले. त्यांनी जे उत्तर दिले त्यामुळे त्यांची निवड झाली.
आरीफने मुलाखतीदरम्यान बलात्काराबाबत प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की ‘फाशी देणे हा त्या समस्येवर उपाय नाहीये, फाशी दिल्याने बलात्काराला आळा बसणार नाही. असं केल्यास आरोपी पीडितेला जिवंत ठेवणार नाहीत. त्यामुळे त्यांना फाशी देण्याऐवजी ते ज्या समाजातून येत आहेत तो समाजच बदलायला हवा. त्यामुळे फाशीची सजा देण्याऐवजी समाज सुधारण्यावर आपण जोर द्यायला हवा.’
या उत्तराने आरिफ यांची सर्वत्र चर्चा होत आहे. आरिफ हे यानंतर नागपुरमध्ये जीएसटी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…