टॅटूबद्दल आजच्या तरूण मुला-मुलींमध्ये खुपच आकर्षण आहे. काहीतरी वेगळं आणि इतरांपेक्षा काही तरी वेगळं दिसावं हा त्यामागचा उद्देश असतो. आजच्या तरूण-तरूणींसाठी टॅटू म्हणजे जणू फॅशन सिम्बॉल झाला आहे. वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकाराचे हे टॅटूज काढून घेण्यासाठी अनेक तरूण-तरूणी उत्सुक असतात. बॉडी आर्ट या प्रकारात मोडणारी टॅटू ची ही कला तशी फार पूर्वीपासूनच प्रचलितआहे. पण आता या कलेला एक ग्लॅमरस लूक आला आहे. फिलिपीन्स मध्ये ही कला फार जुनी आहे. फिलिपिन्स मधील एका जुन्या पद्धतीने टॅटू काढणाऱ्या कलाकाराचा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला असून त्याला आतापर्यंत 3.5 कोटी लोकांनी बघितले आहे. बघा व्हिडीओ..
Loading...