Saturday, January 28, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

व्हेंटिलेटरवरचे बाबा ! एका हॉस्पिटलच्या लुटीची सत्य कहाणी…

khaasre by khaasre
September 30, 2018
in नवीन खासरे
0
व्हेंटिलेटरवरचे बाबा !  एका हॉस्पिटलच्या लुटीची सत्य कहाणी…

बरोबर दोन वर्षांपूर्वी बाबांना ‘स्ट्रोक’ आला म्हणून सह्याद्रीत ऍडमिट केलं होतं. त्यांच्या स्ट्रोकची कंडिशन बघता फक्त फिजियो थेरपीचीच गरज होती. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ठेवायची काही गरज नव्हती. पण तरी काही टेस्ट्स करायच्या आहेत आणि observation खाली ठेवुया म्हणून हॉस्पिटलनं ऍडमिट करून ठेवलं.

मग आठवड्याभरानी काहीतरी कारण काढून ICU मध्ये शिफ्ट करायला लागेल असं सांगितलं. (रात्री बारा-एक वाजता ICU admission च्या कसेंट फॉर्मवर सही घेतली) ICU मध्ये admit केल्यावर stroke सोडून इतर कोणतीही condition नसलेल्या माझ्या बाबांना दुसऱ्या दिवशी न्युमोनियाचा त्रास सुरु झाला.

न्युमोनिया आहे, ते फारच क्रिटिकल आहेत म्हणून व्हेंटिलेटर लावला. दोन तीन दिवसांनी व्हेंटिलेटर ची गरज नाही सांगून ICU मधून CCU मध्ये शिफ्ट केलं. ICU आणि CCU मधला फरक म्हणजे इथे व्हेंटिलेटर नव्हता पण त्यांना श्वास घेण्यासाठी तोंडात कायमची नळी खुपसून ठेवली होती.

Stroke मुळे बाबांची वाचा गेली होती, त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांचे हाल आम्हाला बघवत नव्हते. आठवड्याभरानं डॉक्टरांनी सांगितलं की ही अशी श्वासाची नळी फार दिवस ठेवता येत नाही, परत व्हेंटिलेटरवर ठेवुया किंवा tracheostomy करुया. (Tracheostomy म्हणजे गळ्याला भोक पाडून त्यातून ऑक्सिजनची नळी आत सोडतात.)

‘असलं काही करून मला जगवत ठेवू नका’ हे बाबांनी सांगून ठेवलं होतं. तरी हे करायला नको ना असं आईशी आणि भावाशी बोलून त्यांचीही संमती घेतली (that was the toughest discussion in the family we ever had).

“बाबांची tracheostomy करू नका आणि तुमच्या सर्व ट्रीटमेंट्स बंद करा” हे डॉक्टरांना / हॉस्पिटलला मी सांगितलं. डॉक्टरने ‘बघा बुवा, तुमच्या जबाबदारीवर करा जे हवं ते. पण ऑक्सिजनची नळी काढली तर ते २४ तासही survive होतील का हे मी सांगू शकत नाही’ असं म्हणाले. (पुन्हा एकदा, बाबांना फक्त stroke आला होता, बाकी कोणतीही condition नव्हती)

डॉक्टरच्या त्या वाक्यानं मनात गडबड झाली. तरीही धीर एकवटून मी म्हणालो, ‘काढा ती नळी आणि थांबवा तुमच्या ट्रीटमेंट्स. २४ तास इथे observe करू आणि मग आम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ’ त्यांनी खांदे उडवून नर्सला नळी काढायला सांगितलं.

Next 24 hours were the longest 24 hours in my life!

But Baba survived that too! ऑक्सिजनची नळी काढूनही काही झालं नाही. पुढे चारेक महिन्यांनी ते घरी असतानाच गेले, पण तोवर कधीही पुन्हा कृत्रिम ऑक्सिजनची गरज पडली नव्हती.

ह्या सगळ्या प्रसंगांमधून इथली हॉस्पिटलं, डॉक्टर्स, ICU, CCU आणि पेशंटच्या नातेवाईकांना घाबरवून करायला लावणाऱ्या गरजेच्या-बिनगरजेच्या महागड्या ट्रीटमेंट्स ह्या विषयी असंख्य प्रश्नचिन्ह मनात निर्माण झाली… ती अजूनही आहेत…

आणि अजून एक,

Pulling the plug on your loved one is the most difficult decision you can ever have in your life….

असा निर्णय घ्यायची वेळ शत्रूवरही येऊ नये…

– प्रसाद शिरगावकर

Loading...
Previous Post

संपूर्ण देश त्याला गद्दार म्हणतो तरीही तो आहे धोनीचा दिवाना, वाचा पाकिस्तानमधल्या या चाहत्याची कहाणी

Next Post

द्राक्ष्यांपासून मनुके कसे बनवले जातात कधी बघितले आहे का? बघा व्हिडीओ..

Next Post
द्राक्ष्यांपासून मनुके कसे बनवले जातात कधी बघितले आहे का? बघा व्हिडीओ..

द्राक्ष्यांपासून मनुके कसे बनवले जातात कधी बघितले आहे का? बघा व्हिडीओ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In