भारतात ज्याप्रकारे लोकं क्रिकेटसाठी दिवाने आहेत तसंच काहीसं पाकिस्तान मध्ये सुद्धा आहे. तेथील लोकांमध्ये सुद्धा क्रिकेटची प्रचंड आवड आहे. पाकिस्तान संघाला प्रत्येक मॅचमध्ये सपोर्ट करण्यासाठी येणारे चाचा अब्दुल चौधरी हे चांगलेच प्रसिद्ध आहेत. पण मागच्या वर्ल्डकपच्या वेळी ते आर्थिक अडचणीमुळे मॅच बघायला जाऊ शकले नाही. पण त्यांची स्टेडियम मधील ही कमतरता त्यांचे जुळे असलेले मुहम्मद बशीर हे पूर्ण करत आहेत.
पाकिस्तान मध्ये जन्मलेले आणि शोकागो येथे राहणारे चाचा प्रत्येक सामन्यात आपल्या मातृभूमीला सपोर्ट करण्यासाठी हजत असतात. परंतु त्यांच्या हृदयात भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिग धोनी साठी वेगळीच जागा आहे. यासाठी त्यांना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये पाकिस्तानच्या चाहत्यांचा विरोधाचा सामना देखीव करावा लागला आहे. त्यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्या सामन्यातील एक आठवण सांगताना सांगितले की मॅचदरम्यान त्यांना पाकिस्तानी चाहत्यांनी खूप प्रश विचारुन परेशान करून टाकले होते. धोनीचा फॅन असल्याने त्यावेळी मला शिवीगाळ देखील करण्यात आली आणि गद्दार असल्याचे बोलले गेले.
बशीर यांनी केवळ धोनीसाठी आपला विश्वचषक दौरा चालू ठेवला होता. बशीर हे धोनीचा फोटो असलेला कुर्ता आणि टोपी घालतात. धोनी एक खूप चांगला माणूस आहे त्यामुळे तो मला आवडतो असे ते सांगतात.
2011 विश्वचषकात भारत पाकिस्तान सेमिफायनल साठी बशीर हे तिकीटचा जोड लावन्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा एका पत्रकाराने धोनीकडे ही गोष्ट पोहचवली. धोनीने कसलाही विचार न करता आणि काही ओळख नसताना मला तिकीट उपलब्ध करून दिले.
बशीर यांच्या पत्नी हैद्राबाद येथे राहतात, यामुळे त्यांचं भारतासोबत सुद्धा विशेष नातं आहे. धोनीला मुलगी झाल्यानंतर एकदा त्याची बशीर यांनी भेट घेऊन मुलगी ही खूप शुभ असल्याचे सांगितले होते. तेव्हा धोनीने धन्यवाद दिले. धोनीसाठी माणुसकी ही जात धर्म आणि राष्ट्राच्या पलीकडे असल्याचे ते सांगतात. बऱ्याच वेळा मॅचचे तिकीट न मिळल्यास धोनीने उपलब्ध करून दिल्याचे ते सांगतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…