बॉलीवूड मध्ये अभिनेत्री आणि अभिनेत्यांमध्ये अफेअर्स ही सामान्य गोष्ट बनली आहे. एखाद्या सिनेमात सोबत काम करताना मैत्री होते आणि नंतर त्याचे रूपांतर प्रेम आणि बऱ्याच जणांनी पुढे लग्नही केले. पण इंडस्ट्री मध्ये अजून बऱ्याच अशा जोड्या आहेत ज्यांना त्यांचं प्रेम नाही मिळालं. आज अशाच 90 च्या दशकातील जोडीबद्दल जाणून घेऊया ज्यांना सिनेमाच्या सेटवर प्रेम झालं आणि त्यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा रंगल्या पण त्यांचं लग्न नाही होऊ शकलं.
हा अभिनेता आहे फिल्म इंडस्ट्री मध्ये अण्णा नावाने प्रसिद्ध असलेला सुनिल शेट्टी. 1992 साली सुनील शेट्टीने बलवान या सिनेमाद्वारे आपल्या बॉलीवूड करीअरची सुरुवात केली. सुनील शेट्टीने आजपर्यंत 110 सिनेमात काम केले आहे. त्याच्या या अभिनयाच्या प्रवासात त्याने अनेक मोठमोठ्या अभिनेत्री सोबत सिनेमात काम केले. अनके हिट रोमँटिक सिनेमे त्याने दिले. पण सुनील शेट्टीचे नाव यशाच्या शिखरावर असताना एका सुंदर अभिनेत्री सोबत जोडले गेले.
ती सुंदर अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे सोनाली बेंद्रे. सोनाली बेंद्रे आणि सुनील शेट्टी यांनी टक्कर, सपुत, कहर आणि भाई सारख्या सिनेमात सोबत काम केले आहे. बोलले जाते की 1997 मध्ये सुपरहिट झालेल्या या जोडीच्या भाई सिनेमदारम्यान हे दोघे खूप जवळ आले होते. ज्याची चर्चा त्यावेळी सर्वत्र झाली होती.
सिनेमाच्या सेटवर या दोघांची केमिस्ट्री बघून त्यांच्या अफेअरची चर्चा बॉलीवूड मध्ये मोठ्या प्रमाणावर होत होती. एवढेच नाही तर सोनाली बेंद्रेने सुनील शेट्टीला लग्नासाठी प्रपोज केल्याचे पण कळते. परंतु सुनील शेट्टी हा प्रस्ताव स्वीकारू शकला नाही.यामागचे कारणही तसेच मोठे होते.
सुनील शेट्टीनेच एका इंटरव्ह्यू दरम्यान आपल्या आणि सोनाली बेंद्रेच्या लग्नावरून खुलासा केला होता. सुनील शेट्टीने सांगितले की त्याचे जर अगोदर लग्न झालेले नसते तर सोनाली सोबत लग्न करण्यासाठी विचार केला असता. बॉलीवूड मध्ये येण्यापूर्वीच सुनील शेट्टीचे लग्न झालेले होते. त्याने आपली लहानपणी पासूनची मैत्रीण माना सोबत 1991 मधेच लग्न केले होते. अशामध्ये सोनाली सोबत लग्न करून तो आपल्या बायकोला धोका देण्याच्या विचारात नव्हता.
सुनील शेट्टीने लग्नाला नकार दिल्यानंतर सोनाली बेंद्रेने 2002 मध्ये गोल्डी बहल सोबत लग्न केले. गोल्ड एक प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक आहेत. ज्यांनी अंगारे बस इतना सा खाँब है आणि लंडन पॅरिस न्यूयॉर्क सारखे सोनेमे दिग्दर्शित केले आहेत. दुसरीकडे सुनील शेट्टी सुद्धा एक यशस्वी अभिनेता आहे, जो आपल्या बिजनेसकडे सुद्धा ध्यान देतो. सुनीलचे वैवाहिक जीवन सुद्धा सफल राहिले असून त्याला अहान अंक आथिया ही दोन मुलं आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…