काही महिन्यांपूर्वी टप्पू म्हणजेच भव्य गांधीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा प्रसिद्ध शो सोडला आहे. त्याचा पहिला गुजराती चित्रपट ‘पापा तमने नै समजाय’ ऑगस्टमध्ये रिलीज झाला असून, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. पर्सनल लाईफचा विचार करता भव्य पॅरेंट्सबरोबर बोरीवली, मुंबईत एका 3BHK अपार्टमेंटमध्ये राहतो, आणि त्याच्या घराची किंमत 3 कोटी असल्याचे सांगितले जाते. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भव्य गांधीची आई यशोदा गांधी म्हणाल्या, भव्य त्याच्या गाजलेल्या ऑनस्क्रीन कॅरेक्टर म्हणजे टप्पूपेक्षा अगदी वेगळा आहे. रियल लाईफमध्ये तो फार मॅच्युअर आहे. काळाबरोबर भव्यमध्ये बराच बदल झाला आहे. तो कुटुंब आणि मित्रांबरोबर जास्त वेळ घालवतो. त्याला ते आवडते. किमान एक तास मित्र कुटुंबाबरोबर घालवता येईल याची तो काळजी घेतो. मला त्याच्यावर अभिमान वाटतो.