अभिनेत्री करिना कपूर आणि बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान यांचा मुलगा आहे. बॉलिवूडचा छोटा नवाब तैमूर अली खान नेहमीच चर्चेत असतो. त्याच्याबद्दल नवनवीन गोष्टी जाणून घेण्यास अनेक चाहते उत्सुक असतात. कधी कधी त्याला ट्रोल देखील करण्यात येते. पण तैमूरच्या क्यूटनेसवर सगळेच फिदा आहेत. अशी एखादीच व्यक्ती असेल ज्याला तैमूर अली खान आवडत नाही. अजून तैमूरने 5 वर्ष पण पूर्ण केले नाहीत पण त्याचे लाखो चाहते आहेत. तैमूरची पॉपुलैरिटी एखाद्या मोठ्या सुपरस्टारपेक्षा कमी नाहीये.तैमूरला इंडस्ट्रीमधील सर्वात पॉप्युलर आणि क्युट मुलगा म्हणून ओळखले जाते.
तैमूरच्या सगळ्या गोष्टी वाचायला चाहत्यांना आवडतात. पण त्याला सांभाळणाऱ्या मावशीबद्दल खूप कमी जणांना माहिती असेल. तैमूरला सांभाळणाऱ्या मावशीबद्दल तुम्हाला काही माहित आहे का? नाही ना तर चला खासरेवर जाणून घेऊया तैमूरची काळजी घेणाऱ्या या मावशीबद्दल..
छोट्या नवाब तैमुरला सांभाळणे म्हणजे सोपे काम नाहीये. तैमूरला सांभाळणाऱ्या मावशीना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. पण यासाठी त्यांना मिळणारा पगार देखील तेवढाच मोठा आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीशी तुलना केल्यास हा पगार किती तरी पटीने अधिक असल्याचे दिसते. एबढेच काय तर या मावशींना मिळणारा पगार हा इंजिनिअर्स, एमबीए आणि आयटी प्रोफेशनल असलेल्या व्यक्तींपेक्षादेखील अधिक आहे. आणि फक्त पगारावर न थांबता या मावशींना प्रवासाचा खर्च देखील दिला जातो. मावशीकडे एक पर्सनल कार देखील आहे ज्यामधून त्या तैमूरला फिरायला घेऊन जातात. तैमूरच्या या मावशीचं नाव सावित्री आहे.
सावित्री यांना तैमूरला सांभाळण्यासाठी 1 लाख 75 हजार पगार मिळतो. जुहूत असलेल्या एका हाय प्रोफाइल एजन्सीद्वारे डोमेस्टीक हेल्पकरता या मावशी हायर केल्या जातात. सोहा अली खान आणि तुषार कपूरने देखील येथून मावशी हायर केल्या आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…