भारतात विविध धर्म आणि जाती आहेत. परंतु एक असाही समाज आहे जो मुस्लीम सुध्दा आहे आणि हिंदू सुध्दा असा समाज आहे हुसैनी ब्राम्हण जो मोहरमच्या दुखाःत रडतो आणि दिवाळी सुध्दा साजरी करतो. त्यांचा इतिहास महाभारतातील काळातील आहे असे सांगतात. महाभारत झाल्यानंतर एकच व्यक्ती जिवंत होता तो म्हणजे अश्वस्थामा, युद्धानंतर अश्वस्थामा इराक मध्ये राहण्यास गेले असे सांगतात.
त्यांचे वंशज आज हुसैनी ब्राम्हण म्हणून ओळखल्या जातात. यांनाच दत्त ब्राम्हण किंवा मोहियाल ब्राह्मण म्हणून ओळखल्या जाते. इथे त्यांनी अनेक राज्यावर राज्य केले. यापैकी एक प्रसिद्ध राजा राहिब सिद्ध दत्त हा आहे. यांचा कार्यकाल मोह्म्द्द पैगंबर यांचा नातू इमाम हुसैन यांच्या काळातील आहे. इमाम हुसैनच्या आशीर्वादाने राजा राहीब सिद्ध दत्त यांना अपत्य प्राप्ती झाली असे सांगण्यात येते.
करबला मध्ये लढले हुसेन करिता: इसवीसन ६८० मध्ये हुसैन आणि मुसलमानाचे प्रमुख खलीफ़ा उम्मय्या वंश चे यज़ीद यांच्या मध्ये युद्ध झाले. या युद्धात हुसैन आपल्या वडिला करिता आणि इस्लाम करिता मृत्युमुखी पडले. या लढाई नंतर यज़ीदी सैनिक हुसैनचे शीर दमिश्क (आजचे डमस्कस) ला घेऊन आले. या गोष्टीचा राहीब दत्त यांना राग आला आणि त्यांनी यजीदि सैनिका सोबत लढाई लढून हे शीर आपल्या ताब्यात घेतले.
या नंतर ते आराम करत असताना परत यजीदि सैन्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि सैनिकांनी हुसैनचे शीर परत करण्यास सांगितले. या नंतर राहीब यांनी आपल्या मुलाचे शीर कापून त्यांना दिले. हुसैन करिता आपले सात मुले त्यांनी कुर्बान केली असे सांगण्यात येते.
सध्या हुसैनी ब्राम्हण समाज पाकिस्तान, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र आणि अरब देशात राहतो. ते प्रत्येक वर्षी मोहरम साजरा करतात आणि हिंदू धर्माला देखील मानतात. जिथे राहीब आणि त्याच्या सैन्याने आराम केला होता त्या जागेस हिंदिया जिल्हा ह्या नावाने ओळखल्या जाते. आपल्या माहिती करिता प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त देखील याच समाजाचे होते. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांना त्यांचा धर्म विचारल्यास त्यांनी हुसैननि राहीब ला सुलतान ची उपाधी देताना जी ओळ म्हटली होती ती ” वाह दत्त सुल्तान! हिंदु का धर्म मुस्लमान का इमान आधा हिंदु आधा मुस्लमान ” हि म्हणून दाखवली.