आजवरची सर्वात चर्चेत राहिलेली नेटफ्लिक्सची सिरीज सेक्रेड गेम्सच्या पुढील भागांचा टीझर प्रदर्शित झाला आहे. एक डॉन गणेश गायतोंडे, पोलीस सरताज सिंग आणि २५ दिवसांचा टाइमबॉम्ब लागलेलं मुंबई शहर या कथानकाभोवती फिरणारी ही वेबसिरीज तुफान लोकप्रिय झाली आहे. याचा पहिला भाग इतका लोकप्रिय झाला आहे कि दुसऱ्या भागासाठी चाहत्यांनी आंदोलन करून हा भाग लवकर आणावा म्हणून मागणी केलेली.
अनुराग कश्यप दिग्दर्शित सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी, सैफअली खान, राधिका आपटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. पहिल्या भागातील “कभी लगता है साला आपुन हि भगवान है” हा नवाजुद्दीन सिद्दीकी चा डायलॉग लोकांना प्रचंड आवडला होता आणि त्याचे अनेकांनी मेमे बनवून वायरल केले होते. पहिल्या भागात कुकू आणि गायतोंडे ची लव्हस्टोरी पण लोकांना आवडलेली. कुकूच्या भूमिकेबद्दल हि सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झालेली आहे.
आता येणाऱ्या भागात काय असेल हे नेटफ्लिक्स ने आपल्या एका कॉमेंट मध्ये सांगितले आहे त्यात त्यांनी २५ दिवसात काय होणार आहे ? त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय असतो? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नव्या सिझनमध्ये मिळणार आहेत असे सांगून एक नवीन डायलॉग दिला आहे. ‘तुम्हे लगता है भगवान सबको बचा लेगा? इस बार तो भगवान खुदको भी नहीं बचा सकता!’ हा डायलॉग लोकांच्या पसंतीस उतरेल असे वाटते. या वेबसिरीज चा टिझर आल्याने आता दुसरा भाग येणार या बातमी ने चाहत्या मध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..