अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे जगभरात फॅन फॉलविंग आहे. भारतात सुद्धा त्यांचा मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे. त्यामुळे ओबामांच्या आयुष्यातील घडामोडी बद्दल सर्वाना उत्सुकता असते. आता एक बातमी सोशल मीडियावरून भारतात वायरल होत आहे आणि त्या बातमी मध्ये सांगितले आहे कि “अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती ओबामा आता एका खाजगी ठिकाणी नोकरी करत आहेत. भारतात तर सरपंच जरी झाला तरी त्याच्या ३ पिढ्या बसून खातात.” हा मेसेंज हिंदी भाषेत एका डिझाईनच्या माध्यमातून वायरल होतो आहे. फेसबुक वरील मोठमोठ्या पेजवर हि हाच मजकूर घेऊन पोस्ट केली जात आहे.
पण या वायरल मेसेंज पाठीमागील सत्याचा शोध घेतला असता आम्हाला वेगवेळीच माहिती हाती लागली आहे. ओबामा हे एका हॉटेल मध्ये ऑर्डर घेऊन डिलिव्हरी देत आहे असा त्यांचा सोशल मीडियात फोटो वरील मॅसेंज सहित वायरल होत होता. त्याबद्दल माहिती घेतली असता असे समजले कि तो फोटो २०१२ साला मधील आहे. आणि त्यावेळी ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्रपती होते आणि ते सुट्ट्यावर गेल्या नंतर त्यांनी मार्था येथील एका वाईनयार्ड मधील हॉटेल मध्ये जाऊन एक ऑर्डर केलेली. पण त्या फोटोला क्रॉप करून वापरून चुकीचा मजकूर दिला. दुसरा एक फोटो वायरल होत होता ज्यात ते एका ऑफिस मध्ये बसलेले असून काम करताना दाखवले आहे हा फोटो देखील ते राष्ट्रपती असतानाचा आहे.
एका अजून फोटो मध्ये ओबामा काही लोकांना जेवण वाढताना दाखवण्यात आले आहे आणि त्या फोटो सोबत सुद्धा ओबामा हे एका हॉटेल मध्ये काम करत असल्याचा मेसेंज वायरल केला जात होता. हा फोटो २०१६ साली त्यांच्या घरी त्यांनी रिटायर्ड सैनिकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्यावेळी चा हा फोटो आहे.
आता बराक ओबामा काय करतात व त्यांची आर्थिक स्थिती कशी या बद्दल अनेकांना उत्सुकता आहे त्याबद्दल माहिती घेतली असता. बराक ओबामा याना पूर्व राष्ट्रपती म्हणून वर्षाला १ कोटी ५० लाख रुपयाची पेन्शन मिळते. तसेच पूर्व राष्ट्रपती म्हणून त्यांच्या देशविदेशातील भेटींसाठी त्यांना १ कोटी ४० लाख देण्यात येतात. सोबत त्यांनी नेटफ्लिक्स या कंपनीसोबत कन्टेन्ट निर्मिती बाबतचा करार केला त्यातून त्यांना काही मिलियन डॉलर मिळणार आहेत तर एका पुस्तक प्रकाशन कंपनी कडून त्यांना २ पुस्तकासाठी भरघोस रक्कम देण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ज्या काही बातम्या पसरल्या आहेत त्यात कोणतेही तथ्य नाही. ओबामा यांची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असून ते कुठेही खाजगी नोकरी करत नाहीत.