भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा यांच्याशिवाय संघातील अन्य खेळाडूंच्या हेल्मेटवर राष्ट्रध्वजाचे स्टिकर पाहायला मिळते. पण, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या हेल्मेटवर मात्र, असा तिरंगा दिसत नाही. धोनीच्या हेल्मेटवर फक्त बीसीसीआयचा लोगो असल्याचे पाहायला मिळते. धोनीच्या हेल्मेटवर तिरंग्याचे स्टिकर दिसत नाही याला खास कारण आहे. आज खासरे वर बघूया कुठल्या कारणामुळे धोनी वापरत नाही हेल्मेटवर तिरंगा
महिंद्रसंग धोनी उर्फ माही हा भारतीय क्रिकेट मधील सर्वात जास्त यशस्वी कॅप्टन ठरला होता. त्याचे मैदानावरचे थंड डावपेच प्रतिस्पर्धी टीमला हैराण करीत असे. माहीचा जन्म रांचीला 7 जुलै १९८१ ला झाला. माहीला एक भाऊ नरेंद्रसिंग आणि एक बहीण जयंती गुप्ता. लहानपणा पासून माही सगळ्यांचा लाडका होता. धोनी कुटुंब मध्यमवर्गीय आणि संस्कारी. घरात वडिलांची कडक शिस्त होती. मुलांनी नीट अभ्यास करावा, पास व्हावे आणि नोकरी करावी अशी माफक अपेक्षा होती. पण आई च्या मते माही वेगळा मुलगा होता. त्याला खेळांची खूप आवड होती. त्याचा पण सचिन हा आदर्श होता. सचिन आणि अॅडम गिलख्रिस्त ह्यांच्या सारखे त्याला विश्व विख्यात व्हायचे होते. आणि तो यामध्ये यशस्वी सुध्दा झाला.
धोनी भारताच्या यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडतो. क्षेत्ररक्षणाच्या दरम्यान अनेकदा त्याला हेल्मेट काढून जमीनीवर ठेवावे लागते. हेल्मेट जमिनीवर ठेवल्यानंतर राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये यामुळेच धोनीने त्याच्या हेल्मेटवर तिरंग्याचे स्ट्रिकर लावलेले नाही. नियमानुसार, राष्ट्रध्वज असणाऱ्या वस्तूंना जमिनीवर ठेवणे राष्ट्रध्वजाचा अपमान ठरते. त्यामुळेच राष्ट्रध्वजाच्या सन्माना प्रती धोनीच्या हेल्मेटवर तिरंग्याचे स्टिकर दिसत नाही.
२०११ च्या विश्वचषकात महेंद्रसिंह धोनीच्या हेल्मेटवर तिरंगा दिसला होता. पण त्यानंतर तो धोनीने हेल्मेटवर तिरंग्याचे स्टिकर वापरणे बंद केले. हेल्मेटवर भारतीय राष्ट्रध्वजाच्या स्टिकरला प्राधान्य देणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिला भारतीय क्रिकेटर आहे. सचिननंतर भारतीय संघातील अनेक क्रिकेटर्स हेल्मेटवर तिरंग्याचे स्टिकर वापरताना दिसते. विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना अनेकजण सचिनप्रमाणे बीसीसीआयच्या लोगोच्या वर तिरंग्याला स्थान देतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
अधिक वाचा: कशाप्रकारे केले जाते लालबागच्या राजाचे विसर्जन, बघा व्हिडिओ…
अधिक वाचा: फकीर म्हणवून घेणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची संपत्ती पाहून आपण थक्क व्हाल..
अधिक वाचा: अट्टल दरोडेखोर लाल्या मांग ! का आहे या दरोडेखोराबद्द्ल लोकांच्या मनात अजूनही आदर..
अधिक वाचा: या 9 पाकिस्तानी जाहिराती बघितल्यावर हसून हसून पोट दुखेल..