भजन गायनात अनुप जलोटा हे नाव अनेक दशके झाली प्रसिद्ध आहे. त्यांच्या वडिलांपासून भजन गायन चालत आले आहे. त्यामुळे अनुप जलोटा यांचा गायनात कोणी हात धरू शकत नाही. त्यांची अनेक भजन प्रसिद्ध आहेत. अनेकांची सकाळ किंवा धार्मिक कार्यक्रम जलोटा यांच्या गाण्यांशिवाय पूर्ण होत नाही. एवढी त्यांची भजन गायकी आहे. पण आता अनुप जलोटा हे चर्चेत आलेत ते भजनामुळे नाही तर त्यांच्या गर्ल फ्रेंड मुळे चर्चेत आले आहेत.
अनुप जलोटा यांचे तीन लग्न झाली आहेत. पहिले लग्न त्यांनी त्याची शिष्य असणाऱ्या सोनाली शेठ सोबत झाले होते त्यांनी दोघांनी अनेक संगीत कार्यक्रम हि अनुप आणि सोनाली जलोटा या नावाने केली. पण हे लग्न जास्त काळ टिकले नाही. त्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर बीना भाटिया हिच्या सोबत लग्न केले. हे पण लग्न जास्त काळ टिकले नाही त्यानंतर त्यांनी मेधा गुजराल हिच्या सोबत लग्न केले आणि हिच्या पासून त्यांना आर्यमन नावाचा मुलगा आहे. मेधा हीचा मृत्यू २०१४ साली आजाराने झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात त्यांच्या हुन ३७ वर्ष लहान असणारी जसलीन मथारू हि आली.
जसलीन २८ वर्षांची असून ती मूळची कोलकाताची आहे. गायनात तिला रुची असून वयाच्या ११व्या वर्षापासून तिने गायनाचे प्रशिक्षण घेतले. क्लासिकल आणि वेस्टर्न या दोन्ही प्रकारच्या गायनात ती निपुण असल्याचं म्हटलं जातं. तिने आजवर बऱ्याच प्रसिद्ध गायकांसोबत परफॉर्म केले आहे.जसलीनचं सौंदर्य आणि तिचं नृत्यकौशल्य मला सर्वाधिक आकर्षित करत असल्याचं जलोटा यांनी ‘बिग बॉस’च्या ग्रँड प्रिमिअरमध्ये सांगितलं आहे.
त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली बिगबॉस च्या प्रीमिअर मध्ये देऊन दोघेजण बिगबॉस मध्ये सहभागी होत आहेत. या दोघांच्या जोडीचा रोमान्स आपल्याला आता बिग बॉस मध्ये पाहायला मिळेल. तसेच अनुप जलोटा याना सर्वाधिक मानधन पण बिगबॉस या कार्यक्रमात मिळणार आहे. एकूण धार्मिक आणि भक्तिमय वातावरण तयार करणाऱ्या अनुप जलोटा यांचे बिगबॉस मध्ये वेगळे रूप लोकांना पाहायला मिळेल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…