Saturday, January 28, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वेश्या वस्ती बुधवार पेठ बद्दल संपूर्ण माहिती

khaasre by khaasre
September 17, 2018
in बातम्या
0
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वेश्या वस्ती बुधवार पेठ बद्दल संपूर्ण माहिती

पुणे तिथे काय उणे ही म्हण सर्वत्र ऐकायला मिळते. पुणेचा इतिहास जुना त्यामुळेच पुणेला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हनतात. याच पुणेतील बुधवार पेठ आणि त्यामध्ये चालणारी वेश्या वस्ती हा ब-याच लोकांना चर्चेचा विषय आहे. बाळाजी विश्वनाथ पेशवा याने पुण्यात अनेक पेठा वसवल्या, त्यापैकी एक म्हणजे बुधवार पेठ. आज खासरे वर बघुया बुधवार पेठ संपूर्ण इतिहास व माहिती

पुण्यातील सुप्रसिद्ध दगडुशेठ गणपती मंदिर याच भागात आहे. अप्पा बळवंत चौक ही पुस्तकांची मोठी बाजारपेठ इथेच आहे. बुधवार पेठ हे इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे खुप मोठे व्यवसाय केंद्र आहे. सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरु केली होती. हा विषय विस्मरणात गेला आहे. आज बुधवार पेठ हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. य सर्वाची सुरवात कधी झाली तर ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांची लैंगिक सुखाची गरज भागविण्यासाठी कम्फर्ट झोन म्हणुन रेडलाईट एरियांची निर्मिती केली. ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कुंटणखाने निर्माण केले. पुण्यात १९४१ साली मार्गो चा अड्डा हा कुंटणखाना प्रसिद्ध होता. तेव्हापासून हाा कुंटणखाना प्रसिद्ध आहे. पुण्यातील बुधवार पेठ हा देशातील प्रसिद्ध रेडलाईट एरिया असुन नेपाळी मुली मोठ्या संख्येने या व्यवसायात दिसुन येतात. परंतु काही वर्षा अगोदर नेपाळ भुकंपानंतर अनेक मुली बुधवार पेठ सोडुन नेपाळला निघुन गेल्या. भारतात वेश्याव्यवसाय बेकायदेशीर आहे, परंतु दिलेल्या विशेष क्षेत्रात त्यास मर्यादा नाहीत. खाजगिरीत्या अनेक ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवला जातो, त्याला सहसा अडथळे आणले जात नाहीत. मात्र अधिकृत मंजुरीही दिली जात नाही. या भागाचे विशेष हे आहेे की, बुधवार पेठमध्ये दिवसभर पुस्तके खरेदी करणाऱ्यांची गर्दी असते. जसजशी संध्याकाळ होऊ लागते तसतशी बुधवार पेठेचे रस्ते वेश्याबाजाराने गजबजुन जातात. संध्याकाळ झाली की या वेश्या भडक मेकप व कस्टमरला आकर्षित करणारी कपडे घालुन रस्त्यावर, दारात, गॅलरीतुन मादक इशारे करतात. इथे एकवेळच्या संभोगासाठी सर्वसाधारणपणे ३५० रुपये रेट घेतला जातो. तासाचे रेट १००० पासुन आहेत.

बुधवार पेठेत आलेल्या कस्टमरांना इथल्या वेश्यांचे आता है क्या, चलना अच्छी सर्विस दुंगी, मजा आयेगा असल्या शब्दांनी तर काही वेश्या मादक इशारे करुन, डोळे मारुन, आपल्या अर्धवट उघड्या स्तनांचे दर्शन देऊन जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. इथल्या कुंटणखाण्यातील खोलीत प्रवेश केल्यावर सुरुवातीला एक वेटिंगरुम असते. त्याच्या आतमध्ये संभोगासाठी एक कॉट बसेल आणि कस्टमरला उभे राहता येईल एवढ्याच मापाच्या अनेक कंपार्टमेंट आहेत. दिवसभर वेश्या टिव्ही सिरियल्स पाहणे, चित्रपट पाहणे, खरेदी करणे यात वेळ घालवतात. कस्टमरला त्याचा मोबाईल संभोगखोलीत घेऊन जायला परवानगी नसते. त्याला काऊंटरला बसलेल्या मालकिणीकडे जमा करावा लागतो. तसेच निवडलेल्या वेश्येला अगोदरच ठरलेल्या रेटचे पैसे द्यावे लागतात. वेश्या त्यातली ठराविक रक्कम कुंटणखाना मालकिणीला देते. काही वेश्या बंद कंपार्टमेंटमध्ये गेल्यावर कस्टमरशी गोड बोलुन जादा पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेश्येला तिचे मेकअप सामान, कमविलेले पैसे, कंडोम व इतर साहित्य ठेवण्यासाठी छोटीशी लॉकर दिले जातात.

बुधवार पेठ प्रकााशझोतत जागतीक स्तरावर आली २००८ मध्ये मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांनी बुधवार पेठला भेट दिली होती. त्यावेळी ते अनेक वेश्यांना भेटले व सुमारे तासभर इथल्या वेश्यांसोबत एड्स सारख्या रोगांवर त्यांनी चर्चा केली. बिल गेट्स यांच्या संस्थेने वेश्यांच्या पुनरुत्थानासाठी २०० मिलीयन अमेरिकी डॉलरची मदत केली होती. वेश्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सहेली संस्थेने सुरक्षेच्या नावाखाली केलेल्या सर्वेक्षणानुसार बुधवार पेठमध्ये ४४० कुंटणखाने असुन त्यामध्ये ७००० हुन अधिक वेश्या आहेत. सहेली संस्था वेश्यांमध्ये मासिक पाळी, सुरक्षित गर्भपात, प्रसुती, गर्भावस्था, स्तनपान, कुटुंब नियोजन याविषयी जागरुकता करते. सहेली संस्थेच्या सर्वेक्षणानुसार बुधवार पेठेतील वेश्या जुन्या लाकडी घरांतील ८x६ च्या छोट्या खोल्यांमध्ये राहतात. इथला रस्ता पाच फुटांचा असल्याने संध्याकाळी इतकी गर्दी होते की नीट चालताही येत नाही.

फक्त संभोगासाठी येणाऱ्या कस्टमरपेक्षा नवख्या, आंबटशौकीन, डोळ्यांची दिवाळी करणाऱ्या लोकांचाही इथे जास्त वावर असतो. आजकाल हाय प्रोफेशनल वेश्या होम डिलिव्हरी, व्हाट्सअप्प, फेसबुक, ऑनलाईन एस्कॉर्ट जाहिराती, कॉल फॉर सेक्स सारख्या पद्धती वापरुन आपला व्यवसाय करतात. १९५६ च्या PITA कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी २०० मी अंतरात लैंगिक संभोग करण्यास मनाई आहे. त्यासाठी ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा आहे. तसेच १८ वर्षपेक्षा कमी वयाच्या लहान मुलीसोबत संभोग करणाऱ्यास शिक्षा व दंड होतो. जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या वतीने वेश्यावस्तीमध्ये मोफत कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या पुरवल्या जातात. जिल्हा कायदेविषयक सेवा प्राधिकरण (DLSA)च्या वतीने बुधवार पेठेतील सेक्स वर्कर्ससाठी मोफत कायदेविषयक मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. दोन महिला वकील दररोज या केंद्रात उपस्थित असतात.

तृतीयपंथी आणि वेश्यांमध्ये देहविक्रयावरुन सतत संघर्ष, भांडणे होतात. मात्र येथील तृतीयपंथीयांनी “आशीर्वाद” या संस्थेच्या माध्यमातुन गेल्या दहा वर्षांपासुन बुधवार पेठेतील वेश्यांच्या मुलांसाठी बालवाडीची शाळा सुरु केली आहे. पुण्यातील वंचित विकास ट्रस्टतर्फे १९८९ पासुन “निहार” हा विशेष प्रकल्प चालवला जातो. यात वेश्येंच्या बालकांसाठी निवासी केंद्र चालवले जाते, ज्यात बालकांचे पालनपोषण, शिक्षण, रोजगार याकडे लक्ष दिले जाते. याप्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. चैतन्य महिला मंडळाच्या वतीने लैंगिक अत्याचारात बळी पडुन नाईलाजाने वेश्याव्यवसायात उतरलेल्या महिलांच्या बालकांसाठी उत्कर्ष व मोहर ही एक चालवली जातात. तिथे मुलांना दोन वेळ नाश्ता दुध, रात्रीचे जेवण तसेच शिक्षण पुरवले जाते. वेश्याव्यवसाय करणाऱ्या वेश्या धंद्याच्या वेळी त्यांची लहान बाळं त्रास देतात म्हणुन त्यांना अफु देऊन गुंगवायच्या. पाळणाघरामुळे हे प्रकार बंद झाले आहेत.

हि माहीती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका…

Loading...
Previous Post

संपूर्ण मुंबईचा ‘डॅडी’ कधीकाळी दूध विकून भरायचा कुटुंबाचे पोट…

Next Post

प्रधानमंत्री मोदींच्या दैनंदिन वापरातील वस्तुंची किंमत तुम्हाला माहीत आहे का ?

Next Post
प्रधानमंत्री मोदींच्या दैनंदिन वापरातील वस्तुंची किंमत तुम्हाला माहीत आहे का ?

प्रधानमंत्री मोदींच्या दैनंदिन वापरातील वस्तुंची किंमत तुम्हाला माहीत आहे का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In