देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांची पत्नी असल्याने नीता अंबानी यांना आपण सर्वजण जाणतो. त्यांना देशातील सर्वात श्रीमंत महिला मानले जाते. त्यांनी स्वतःही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या लाइफस्टाइलची चर्चा नेहमीच होत असते. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या दिवसाच्या खर्चाविषयी माहिती दिली होती. तेव्हा पण त्या चांगल्याच चर्चेत आली होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे नीता अंबानी या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आहेत. पण सध्या त्या एका दुसऱ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. त्यामागचं कारण आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला त्यांचा डान्सचा व्हीडीओ.
तुम्हाला जाणून हैरानी होईल की या व्हीडीओ मध्ये त्या मैदान किंवा एखाद्या कार्यक्रमात नाहीत आणि त्या एखाद्या बिझनेस मीटिंग मध्ये सुद्धा नाहीयेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडीओ मध्ये नीता अंबानी या गुजराती गाणे हे शुभारंभ वर गरबा करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही महिला आणि बॉलीवूड स्टार जुही चावला ही सुद्धा त्यांच्या सोबत दिसत आहे. यापूर्वी सुद्धा नीता अंबानी यांच्या डान्सचा व्हीडीओ अनेकवेळा व्हायरल झाला आहे. बघा व्हायरल झालेला व्हीडीओ…