सहारनपुर दंगली नंतर एसपी सुभाष चंद्र दुबे यांनी बयान दिले कि या दंग्या पाठीमागे दलित युवा संघटन आहे “भीम आर्मी” तेव्हा हे नाव प्रकाशझोतात आले. भीम आर्मी नाव ऐकताच लोकामध्ये कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक होते भला भीम आर्मी हि काय नवीन भानगड ? काय आहे भीम आर्मी ? कोण आहे या भीम आर्मी पाठीमागे ? चला पहिले जाणून घेऊया काय आहे भीम आर्मी…
सहारनपुर येथील एएचपी कॉलेज नावाचे महाविद्यालय आहे. तिथे रजपूत समाजाचे वर्चस्व चालायचे. दलित विद्यार्थ्यासोबत अनेक वेळेस इथे अत्याचार झाला. त्यांना बसायला सुध्दा वेगळी व्यवस्था केली जात होती. पाणी पियाला देखील इथे दलितांना वेगळी व्यवस्था होती. त्या काळात इथे एका युवकाने प्रवेश घेतला त्याचे नाव चंद्रशेखर ! महाविद्यालयातील अवस्था बघून त्याने दलित विद्यार्थी संघटीत करायला सुरवात केली. दलित एकत्र झाले परंतु यांचा परिणाम असा झाला कि रोज महाविद्यालयात भांडण होत असे. दोन्हीकडील विद्यार्थी भांडणात पडत असे. बरेच वेळ राजपूत घायाळ झाले तेव्हा त्याचा परिणाम असा झाला येथील राजपूत वर्चस्व कमी होण्यास सुरवात झाली. एक काळ असा आला कि येथील राजपूत वर्चस्व पूर्णतः संपुष्टात आले. त्यामुळे हे महाविद्यालय भीम अर्मीस प्रेरक ठरले.

भीम आर्मीची औपचारिक स्थापना २०१५ला झाली सुरवातीस यांचा उद्देश दलित रक्षा आणि मोफत शिक्षण हा होता. सहारनपुर येथील भादों या गावात त्यांनी पहिली शाळा सुरु केली. परंतु अचानक यास वेगळे वळण मिळाले, हि घटना आहे सहारनपुर-देहरादून रोडवर वसलेले घड़कौली या गावची आहे. दलित युवक अजय कुमार याने घड़कौली या गावात भीम आर्मीची स्थापना केली आणि गावच्या सुरवातीस एक बोर्ड लावले. बोर्डवर लिहले होते ‘दे ग्रेट चमार’ परंतु हि गोष्ट ‘दे ग्रेट राजपूताना’ या संघटनास पचली नाही. त्यांनी ‘द ग्रेट चमार’ या बोर्डला काळे फासले. त्यानंतर गावात भांडणास सुरवात झाली त्यांनी बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना केली. हि गोष्ट भीम आर्मीच्या इतर सदस्यांना कळली आणि ते घटनास्थळी येताच ‘दे ग्रेट राजपूताना’ सदस्यांना माघार घ्यावी लागली.
भीम आर्मीची मुख्य संकल्पना आणि स्थापना छुटमलपुर येथील एक दलित चिंतक सतीश कुमार यांची आहे. परंतु त्यांना या आर्मीची धुरा सांभाळणारा योग्य युवक मिळत नव्हता. त्यानंतर सतीश कुमार यांची भेट चंद्रशेखर यांच्या सोबत झाली आणि त्यांनी चंद्रशेखर उर्फ रावण यास भीम आर्मीचा संस्थापक बनविले.

भीम आर्मीचे पहिले शक्ती प्रदर्शन दिल्ली येथील जंतर मंतर येथे झाले होते. सहारनपुर येथील दंग्यातील आरोपींना निर्दोष मुक्त करा अशी त्यांची मागणी होती. चंद्रशेखर स्वतःला रावण म्हणतात याच्या मागे तो त्याचे तथ्य सांगतो कि ” रावणाने बहिणीच्या सन्माना करिता सीतेचे अपहरण केले आणि सीतेलाहि पूर्ण सन्मानाने वागविले. जो आपल्या बहिणीच्या सन्माना करिता आपले सर्वकाही दावणीस लावतो तो चुकीचा कसा असू शकतो ?” असे चंद्रशेखरचे म्हणणे आहे.
सहारनपुर येथील दंग्यामुळे तो १६ महिने जेल मध्ये होता. नुकतीच त्याची सुटका होणार आहे. चला बघूया चंद्रशेखर उर्फ रावण आपल्या समाजाकरिता अजून काय करू शकतो हि सर्वाना उस्तुकताच असेल. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.