जेव्हा एखांदा खेळाडू देशासाठी पदक जिंकून आणतो तेव्हा देशाचा मान सन्मान तो जगभर वाढवत असतो. आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड आहे पण पदके मात्र अत्यंत कमी येतात. याला देशातील क्रीडा धोरण हि कारणीभूत असू शकते. देशासाठी पदक आणल्या नंतर त्या खेळाडूचा काही कालावधी पर्यंत गौरव केल्या जातो नंतर मात्र त्यांच्यासाठी उपेक्षा येते. असाच एक खेळाडू ज्याने देशासाठी पदक मिळवले पण आज त्याला भीक मागावे लागत आहे.
या खेळाडूचे नाव मनमोहन सिंह लोधी असून तो मध्यप्रदेश येथील नरसिंहपूर जिल्यातील कुर्डुरपूर या गावाचा आहे. २००९ मध्ये मनमोहन सिंह लोधी याचा अपघात झाला होता त्यात त्याचे दोन्ही हात त्यांनी गमावले. त्यानंतर तरीही त्याने अहमदाबाद येथे झालेल्या स्पेशल ओलंपिक मध्ये १०० मीटर रनिंग मध्ये रजत पदक जिंकले. त्यानंतर मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मनमोहन सिंह लोधी याला सरकारी नोकरी व मदतीचे आश्वासन दिले होते पण या खेळाडूने मुख्यमंत्री कार्यालयाला अनेक चक्करा मारल्या तरी त्याला दिलेले आश्वासन पूर्ण केले गेले नाही.
मनमोहन याच्या घरातील स्थिती अत्यंत बिकट आहे त्यामुळे त्याला आता गळ्यात जिंकलेली पदके घालून भीक मागावी लागत आहे. आता ANI या न्यूज एजेन्सी सोबत बोलताना त्याने सांगितले कि तो ४ वेळा मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना भेटला आहे त्यांनी आश्वासनाशिवाय काही एक दिले नाही. त्याला खेळण्यासाठी व घर चालवण्यासाठी भीक मागण्या शिवाय कोणताही मार्ग नाहीय.
भारतात क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळातील खेळाडूंची नेहमीच उपेक्षा होत आली आहे. सरकारने इतर खेळात देशासाठी पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना अर्थसहाय्य करावे त्यांना क्रिकेटपटू च्या तुलनेत ५ टक्के तरी सोयीसुविधा द्याव्यात अशी या खेळाडूंची अपेक्षा आहे. माननीय मोदीजी यांनी आता आपल्याला न्याय द्यावा अशी मनमोहन या खेळाडूने अपेक्षा व्यक्त केलीय.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…