ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे तब्बल ४० दिवसांनी गणपती विसर्जन मिरवणूक
नेहमी शांत असणारे पुण्याचे वातावरण १९४२ साली कायदेभंग चळवळीमुळे कमालीचे तंग होते. देशभरातील बर्याच शहरांप्रमाणे पुण्यातील परिस्थिती अत्यंत स्फोटक झाली होती. सभा, मिरवणुका, झेडावंदन, तोडफोडजाळपोळ, आदी मिळेल त्या मार्गांनी पुण्यात ब्रिटिशांविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत होता. ब्रिटिश सरकार शक्य त्या सर्व मार्गेनी कायदेभंगाची चळवळ दडपण्याचा प्रयत्न करत होते. चळवळीत भाग घेण्याच्यांवर तत्काळ व कठोर कारवाई करण्यात
येत होती. तरीही या चळवळीत महिला व विद्यार्थिनीही सहभागी होत होत्या. जोगेश्वरीसमोर झेंडा लावला म्हणून दोन महिलांना प्रदीर्घ कारावासाची शिक्षा करण्यात आली; परंतु यामुळे महिलांचे चळवळीतील योगदान थांबले नाही. वातावरणात विरोधाचे तुफान इतके मोठे होते की सर्वच जण बेभान झाले होते.
१३ ऑगस्ट १९४२ रोजी एका जमावाने मंडईची पोलीसचौकी जाळली व त्यामागील तोफ लक्ष्मी रस्त्यावर आणून टाकली. मोडतोडजाळपोळ यांचे सत्र यानंतरही पुण्यात सुरू होते. रस्त्यावरचे ८०० दिवे अल्पावधीत फोडण्यात आले. यामुळे ब्रिटिशांनी सभा मिरवणुका यावर बंदी अशा लहानसहान उपायांवर न थांबता पुण्यात सात दिवसांकरिता सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत संचारबंदी लागू केली. पुढे ही संचारबंदी १४ दिवसापर्यत लांबवण्यात आली. चळवळ करणार्यांना भय दाखवण्यासाठी ब्रिटिशांनी पुण्यात १० चिलखत रणगाडे आणले सेवासदन चौक, अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, गणपती चौक, या मार्गावर हे रणगाडे मशिनगनधारी जवानांसह गस्त घालू लागले अप्पा बळवंत चौक, विश्रामबागवाडा, आनंद आश्रम, जोगेश्वरी, सेवासदन चौक, काँग्रेस हाऊस, स. प. कॉलेज या ठिकाणी या फौजफाट्याने जमावावर गोळीबार केला.
ऑगस्ट महिन्यात घडलेल्या या घटनांनंतर वातावरण काहीसे निवळले व गणेशोत्सव आला. परंतु ४२ साली सरकारने मेळे, गायन, वादन, कीर्तन या उत्सवाच्या अविभाज्य अंग असलेल्या गोष्टींवर पूर्णपणे बंदी घातली. इतकेच नाही, तर अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीवरही निर्बध घातले. प्रत्येक गणपती मंडळाने पोलीस सांगतील त्या वाटेने व पोलीस सांगतील तितकीच माणसे घेऊन विसर्जन करावे’ असा हकूम बजावण्यात आला.
गणेशोत्सवाच्या १८९३ पासूनच्या परंपरेत पहिल्या वर्षापासून सर्व गणपती एकत्रच विसर्जनास जात होते व अनंत चतुर्दशीची मिरवणूक उत्सवाचे अविभाज्य तसेच महत्त्वाचे अंग असल्याने या हुकुमादि पुण्यात क्षोभ उसळला. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी गणेशोत्सवाचे नियमन करण्याच्या संस्थेने गणपती अक्षता टाकून जागेवरच विसर्जित करावेत व मिरवणुकीची परवानगी मिळेपर्यंत तेथेच राहू द्यावेत’ असे आवाहन केले. त्यांना गणपती ठेवण्यास जागा नव्हती त्यांना गायकवाड वाड्यामध्ये (केसरी) जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. संस्थेच्या या आवाहनानुसार २०० पैकी १४८ गणपतीचे जागेवर विसर्जन करण्यात आले रावसाहेब किराड व शनिपिरजवळील एक असे दोन गणपती सरकारी हुकुमानुसार विसर्जित करण्यात आले. तत्कालीन पुणे नगरपालिकेने ठराव मांडून सरकारचा निषेध केला. प्रशासन इसके पिसाळले होते, की २३ सप्टेंबरल ११ गावे ओळोने चाललो होतो. ही मिरवणूक आहे असे समजून गड ताब्यात घेण्यात आली. ३० सप्टेंबर रोजी नियामक संस्थेची बैठक भरून सरकारले २३ ऑक्टोबर, अधिन शुद्ध चतुर्दशी या दिवशी मिरवणुकीस परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. पुढे तीन आठवडे परवानगी मिळेल या आशेवर सर्वजण होते. त्यामुळे गणपती तसेच ठेवण्यात आले होते. परंतु २३ ऑक्टोबरला मिरवणुकीस परवानगी देण्यात विसर्जित करावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले
प्रदीर्घ काळ वाट बघून परवानगी न मिळाल्याने शिवरामपंत व केळकर यांनी रास्ता पेठ गणपतीची कोजगिरीच्या (२३ ऑक्टोबर )दिवशी दुपारी एक वाजता रास्ता पेठ,नाना पेठ भवानी पेठ, गोबिंद हलवाई चौक, मंडई व पुढे नेहमीच्या मागनि अशी परवानगी न घेता मिरवणूक काढली या मिरवणुकीस पोलिसांनी मंडईजवळ अडवले व जबाबदार व्यक्ती कोण असे विचारले, तेव्हा धर्मवीर विश्वासराव डाबरे व केळकर हे होते त्यांचा पोलिस वाद झाला. तेव्हा पोलिसांनी त्यांना सांगितले, की स्वत:च्या जबाबदारीवर मिरवणूक पुढे न्या. ही बातमी शहरात पसरताच प्रचंड संख्येने लोक मिरवणुकीत जमा झाले.
वाटेत डावरे व केळकर यांनी लोकांनी हार घातले आणि त्यांचा जयजयकार केला. मिरवणूक लकडी पुलावरून मार्गस्थ होताच डावरे यांनी समारोपाचे भाषण केले. या अपराधामुळे डावरे व केळकरांना व अटक करण्यात आली. डिसेपर्यंत हे दोघे येरवडयाला तुरूगातच होते. २३ ऑक्टोबर १० दिवसांनी ३ नोव्हेंबर ये विकीस अचानक परवानगी देण्यात आली. सर्व मंडांचा एकत्रित परवाना नियामक संस्थेचे रामभाऊ दंडवते यांना देण्यात आला. त्यानुसार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता मंडईपासून मिरवणूक सुरू झाली.मिरवणुकीत ९० गणपती सहभागी झाले. पाच वाजता पहिला गणपती विसर्जित झाला व सूर्यास्ताच्या आत सर्व गणपती विसर्जित झाले. मिरवणुकीत पोलीस नव्हते. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीनंतर, तब्बल ४० दिवसांनी, ३ नोव्हेंबर अश्विन कृष्ण दशमीला निघालेली मिरवणूक यशस्वी व निर्विघ्न पार पडली. पोलिस बंदोबस्तशिय ही मिरवणूक पार पडली ही मिरवणुकीस अचानक परवानगी दिल्याने बाहेरगावच्या लोकांना सुची बातमी मिळाली नाही. कारण अर्थात संपर्काची वेगवान साधने नव्हती. त्यामुळे परगावचे नागरिक या मिरवणुकीत सहभागी
होऊ शकले नाहीत. अनंत चतुर्दशीला विसर्जन न होता विधिवत विसर्जन तब्बल ४० दिवसांनी होण्याची ही पुण्याच्या गणेशोत्सवातील पहिली व शेवटची वेळ.
#आठवणीतले_उत्सव लेखक – समीर इंगवले फोटो नेट साभार ..फोटो त्यावेळचा नाही ..पोस्ट साठी वापरला आहे फक्त