सैराट चित्रपटामुळे नागराज मंजुळे हा सर्वांच्या आवडीचा डायरेक्टर म्हणून परिचित आहे. नागराज मंजुळे याच्या सामाजिक भूमिका सुद्धा तेवढ्याच परखड राहिल्या आहेत. त्यामुळे नागराज मंजुळे यांच्या कोणत्याही भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असते. एका ग्रामीण भागातील मागास कुटुंबातील मुलाने चित्रपट क्षेत्रात मिळवलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. नागराज ने फॅन्ड्री सैराट या चित्रपटाद्वारे प्रचंड यश मिळवले. सोबत नवीन कलाकारांना हि स्टार बनवले.
नागराज मंजुळे यांनी परश्या आर्ची या पात्रांना सिने सृष्टी मध्ये अमर बनवले. आता या सैराट टीम ने एक सैराट निर्णय घेतला आहे. कि हा निर्णय ऐकून इतर पक्षातील लोक सुद्धा सैराट होऊ शकतात. तर नागराज मंजुळे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माणचित्रपट कर्मचारी सेनेचं सभासदत्व स्वीकारलं आहे.
या सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सरचिटणीस शशांक नागवेकर, उपाध्यक्ष शर्वणी पिल्लई आणि उमा सरदेशमुख यांच्या उपस्थितीत चित्रपट सेनेचे सभासत्व स्वीकारले. यापूर्वीही अनेक मोठ्या कलाकारांनी मनसेच्या चित्रपट सेनेत प्रवेश केलेला असून ते सक्रीय सदस्य आहेत. राज ठाकरे हे नेहमीच मराठी कलाकारांसाठी आक्रमक भूमिका घेतात. त्यामुळे अनेक कलाकार हे मनसेकड़े आकर्षित होतात.
नागराज मंजुळे यांच्या निर्णयाने मराठी राजकारणात राज ठाकरे यांची जादू अजूनही आहे हे दिसून आले आहे. नागराज मंजुळे चा निर्णय इतरांना आवडतो कि नाही हे पाहणे आत्सुक्याचे आहे. आपल्याला काय वाटते नागराज मंजुळे यांच्या राजकीय निर्णयाबद्दल. ते कॉमेंट करून जरूर सांगावे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…