अवघ्या साडेचार वर्षाच्या सिमरनला 7 सप्टेंबर ला संध्याकाळी सापाने चावा घेतला. गावापासून 1-2 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका दवाखान्यात तिला नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला प्रथमोपचार केले आणि एक इंजेक्शन दिले. पण तिची तब्येत अजून बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी तिला मोठ्या दवाखान्यात नेम्यास सांगितलं. त्यानंतर घरच्यांनी ऍम्ब्युलन्स बद्दल विचारले असता तिथे ऍम्ब्युलन्सचा ड्रायव्हर उपलब्ध नसल्याचे सांगितले. घरच्यांनी तिला टेम्पो ने पुढील उपचारासाठी नेण्याचे ठरवले. पण सिमरनने वाटेतच दम तोडला. ऍम्ब्युलन्स उपलब्ध असती तर कदाचित सिमरनचे प्राण वाचले असते. कदाचित तिला ऍम्ब्युलन्स मुळे लवकर उपचार मिळाले असते.
काय आहे व्हायरल व्हिडिओ मध्ये?
ही घटना बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील आहे. चैनपूर गावात सिमरनचे वडील अमरेंद्र राम राहतात. ही घटना वायरल व्हिडिओ मधूम समोर आली आहे. व्हिडीओ मध्ये अनेक जण जमिनीवर बसलेले दिसत आहेत. एक माणूस कडेवर मुलगी घेऊन दिसत आहे. ती त्याची मुलगी होती जी मरण पावली आहे. खूप रागात तो व्यक्ती मोबाईल कॅमेरा कडे बघून बोलताना दिसतो. त्याचे मत संपूर्ण भारतात पोहचावे असे त्याला वाटते. त्याच्या मुलीच्या जिवंत ते मृत्यू पर्यंतची माहिती तो सांगतो. ‘मोदीजी माझी गोष्ट लक्ष देऊन ऐका मी चैनपूर या गावातून बोलत असून माझ्या मुलीला सापाने चावा घेतला आहे. मेजरगंज मध्ये मी तिला घेऊन पोहचलो होतो. पण प्रशासनाने मला गाडी नाही दिली. तुम्ही बेटी बचाव नाही तर बेटी मराव चा नारा देत आहात. माझ्या मुलीला तुम्ही मारले आहे. या बोटाला साप चावला, मी बांधून इथे घेऊन आलो. मी चांगले उपचार करण्यास विनंती केली. डॉक्टरांनी दोन इंजेक्शन दिले खरे पण कशाचे होते कुणास ठाऊक.
सितामढी घेऊन जाण्यास माझ्याकडे काही वाहन नव्हते. टेम्पो मध्ये घेऊन गेलो. पण माझी मुलगी अर्ध्या रस्त्यात मेली. तुमच्याकडे ऍम्ब्युलन्स नाहीये? हा सरकारी दवाखाना का? मी खोटं बोलत असेल तर मला शिक्षा द्या. पूर्ण समाज सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. बघा हा मृतदेह आहे. जर तुमच्यात दम असेल तर हा व्हिडीओ शेअर करा. बेटी बचाव नाही तर बेटी मारा हे अभियान चालू आहे. उपचार होत नाहीयेत, सत्यानाश होत आहे. माझ्या मुलीला साप चावला तर उपचार नाही भेटले. अर्धा तास माझी मुलगी जिवंत होती. आता स्टॉप करा आणि शेअर करा..’
हए शब्द तुम्हाला निशब्द करतील. मुलीचा मृतदेह हातात घेऊन सुद्धा हा व्यक्ती एवढं व्यवस्थित बोलत आहे. पण व्हिडीओ शेअर करून आणि तो पंतप्रधान आणि मग मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचवून त्यांची मुलगी परत येईल का?
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…