काल पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किमती विरोधात देशभरात बंद पाळण्यात आला होता त्या बंद ला देशभरात पेट्रोल डिझेल च्या किमती ची ज्यांना झळ बसली अशा लोकांनी बंद पाळून निषेध केला. २१ राजकीय पक्षांनी हा बंद पुकारला होता. बंद च्या पाश्वभूमी सोशल मीडियावर ही बंद चा असर दिसून आला होता. अनेक गोष्टी वायरल केल्या जात होत्या. सत्ताधारी भाजप आंतरराष्ट्रीय पेट्रोल च्या किमती पोस्ट करून भारतात कसे स्वस्तच पेट्रोल मिळते हे मांडत होते तर विरोधी पक्षाकडून ही त्याला प्रतिउत्तर दिल जात होते. अशात एक फोटो वायरल झाला आणि सर्वच आश्चर्यचकित झाले.. तो फोटो होता भारतीय स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी व पत्नी साक्षी यांचा..
या फोटो मध्ये महेंद्रसिंग धोनी आपल्या पत्नीसह एका पेट्रोलपंप वर बसलेले दिसून येत होते..सोबत फोटो सोबत मेसेंज लिहिला होता की पेट्रोल डिझेल च्या किमतीत वाढ झाल्या कारणाने निषेध म्हणून धोनी पत्नी साक्षी सह पेट्रोलपंप वर धरणे धरायला बसला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला. फोटोला प्रचंड शेअर करण्यात येत होते. फोटो हुन तर तो फोटो फेक किंवा एडिटेड वाटत नव्हता. पण फोटो मागील सत्य वेगळेच होते.
धोनी पेट्रोलपंप वर बसलेला फोटो कुठला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे लक्षात आले कि हा फोटो खरा आहे आणि तो काही वर्षांपूर्वीचा असून तो शिमला येथील पेट्रोलपंप वर काढण्यात आला होता.
हा फोटो एका जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या वेळी काढलेला आहे. या फोटो चा आणि आताच्या भारत बंद चा कोणताही संबंध नाही. धोनी सारख्या श्रीमंत क्रिकेटर वर कधीच पेट्रोल डिझेलच्या किमतीकरिता आंदोलन करणार नाही.. आता जे काही त्याचे फोटो वायरल केले ते काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…