सोशल मीडियावर आपण कधी अत्याचारासंबंधीच्या गोष्टी शेअर करतो. आपल्याला वाटते कि समोरच्या व्यक्तीला न्याय मिळावा आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळायला हवी. या स्वच्छ भावनेतून आपण खरेतर अशा पोस्ट शेअर करत असतो. या फोटो मधील व्यक्तीला आपण ओळखत असाल. या व्यक्तीचे नाव सर्वजीत सिंग आहे. ३ वर्षांपूर्वी जसलीन कौर या मुलीने सर्वजीत सिंग वर अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप केला व त्याचा फोटो घेऊन एक पोस्ट फेसबुकवर केली. ती पोस्ट प्रचंड प्रमाणात शेअर करण्यात आली.
या पोस्ट नंतर सर्वजीतचे जीवन बदलून गेले. सर्व स्थरातून त्याच्यावर टीका झाली त्याच्या वडिलाना या गोष्टीचा धक्का बसून हार्टअटॅक येऊन गेला त्याची नोकरी गेली. त्याला कोर्टाच्या चक्करा माराव्या लागत आहेत. लग्न करावे अशी आई वडिलांची इच्छा आहे पण अजून न्यायालयातून निकाल लागून हा दाग पुसल्या जात नाहीय. त्यामुळे लग्न सुद्धा होणे शक्य नाहीय. सर्वजीत यांनी असा कोणताही मोठा गुन्हा केला नव्हता. तरीही त्याची बाजू न ऐकता लोकांनी सोशल मीडियावरूनच न्याय देण्याचे काम केले.
२३ ऑगस्ट २०१५ ला दिल्लीच्या टिळक नगर येथील सिग्नल वर सर्वजीत आपल्या बुलेट वर उभा असताना जसलीन कौर ने तेथील सिंगल वरील लोकांना थांबण्याचा इशारा केला. सर्वजीत तेव्हा म्हटला कि मला डाव्या साईड ला जायचे आहे. तर सिग्नल ची काही आवश्यकता नाही. मी डावी कडे जात आहे. तुम्हाला पुढे जायचे असेल तर जाऊ शकता तर जसलीन ने त्याला धमकी दिली कि थांब आता काही वेळात तुझ्या घरी पोलीस येतील आणि तुला घेऊन जातील. कोणत्याही प्रकारची शिवीगाळ सर्वजीत ने केली नव्हती तिथे अनेक लोक साक्षीदार होते. त्यांनी हि सर्वजीत याने कोणतीही शिवीगाळ केली नाही असे सांगितले. पण मुलीने फेसबुक वर खोटे लिहून पोस्ट केली. आणि सर्वजीत चे आयुष्य बदलून गेले त्याला पोलिसांनी अटक केली. नंतर कोर्टात केस सुरु आहे.
जसलीन ने फेसबुक पोस्ट लिहिण्या पलीकडे काहीच केले नाही कोर्टाच्या १३ तारखा झाल्या पण ती एकाही तारखेला उपस्थित राहिली नाही. सर्वजीत ला सव तारखेला जावे लागत आहे. त्याला या केस मधून लवकरात लवकर निघायचे आहे. तो या केस मधून निर्दोष सुटला तर त्याचे आयुष्य पटरीवरील येईल. पण या गोष्टीत मुलीचा इगो दुखावला आणि तिने जो मार्ग निवडला त्यात एका मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…